ETV Bharat / state

कोरोनावर विजय मिळवलेल्या महिलेसह नवजात बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज

नागपुरातील सर्वात मोठ्या कोरोना हॉटस्पॉटपैकी एक असलेल्या मोमीनपुरा या भागात राहणाऱ्या २८ वर्षीय महिलेला प्रसुतीकरिता मेयो रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यावेळी तिची कोरोना चाचणी करण्यात आली होती.

कोरोनावर विजय मिळवलेल्या महिलेसह नवजात बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज
author img

By

Published : May 13, 2020, 9:00 PM IST

नागपूर - शहरातील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुगणालयातून आज कोरोनाबाधित एका महिलेला आणि तिच्या नवजात बाळाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. २९ एप्रिलला महिलेला मेयो रुगणालायत दाखल करण्यात आले होते. आज डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्या महिलेची आणि बाळाची भेट झाली. त्यावेळी ती महिला भावूक झाली असून तिच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.

कोरोनावर विजय मिळवलेल्या महिलेसह नवजात बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज

नागपुरातील सर्वात मोठ्या कोरोना हॉटस्पॉटपैकी एक असलेल्या मोमीनपुरा या भागात राहणाऱ्या २८ वर्षीय महिलेला प्रसुतीकरिता मेयो रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यावेळी तिची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्याच्या काही तासातच तिला प्रसूतीकळा सुरू झाल्या.

त्यानंतर मेयो रुग्णालयातील डॉक्टरांनी त्या महिलेची यशस्वी प्रसूती करण्यात डॉक्टरांना यश आले होते. त्या महिलेने एका गोड मुलीला जन्म दिला. आईला कोरोनाची लागण झाल्याने नवजात बाळाचीदेखील कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यात त्या बाळाला कोरोना झाला नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बाळाला तिच्या आईपासून वेगळे ठेवण्यात आले होते. आता या महिलेने कोरोनाला पराभूत केले असल्याने तिला आज रुग्णालयातुन सुट्टी देण्यात आली आहे. स्वतःच्या बाळाला घेऊन ती महिला घरी गेली आहे. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचरिकांनी बाळाला आईच्या स्वाधीन केले तेव्हा तेथील वातावरण भावूक झाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.