ETV Bharat / state

ITI Student Suicide : नागपूर आयटीआयमधील विद्यार्थीनीची आत्महत्या; कारण अस्पष्ट

author img

By

Published : Mar 12, 2023, 9:45 PM IST

नागपुरातील आयटीआयमधील विद्यार्थीनीने आत्महत्येचा प्रयत्न 6 मार्च रोजी केला होता. शनिवारी रात्री उशिरा तिचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला आहे. आयआयटीमधील विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच ही दुसरी घटना समोर आली आहे.

suicide
फाईल फोटो

नागपूर - शहरातील आयटीआयमध्ये आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या २३ वर्षीय विद्यार्थीनीचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती नागपूर पोलिसांनी रविवारी दिली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, राणी अमरदीप धनविजय हिने 6 मार्च रोजी महाविद्यालयाच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यवेळी ती काही विद्यार्थ्यांना बेशुद्धावस्थेत आढळली होती. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे शनिवारी रात्री तिचा मृत्यू झाला.

कारण अस्पष्ट - नागपुरातील आयटीआयमधील विद्यार्थीनीने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. शनिवारी रात्री उशिरा तिचा मृत्यू झाला आहे. आयआयटीमधील विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच ही दुसरी घटना समोर आली आहे. याप्रकरणी धंतोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.

दर्शनची आत्महत्या - आयआयटीमध्ये काही दिवसांपूर्वी दर्शन सोळंकी या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. दर्शन सोलंकीच्या आत्महत्येनंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे यांनी स्थापन केलेल्या चौकशी समितीने जाती-आधारित भेदभाव नाकारला. जातीय भेदभावामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढता येत नाही, असे त्या अहवालाध्ये सांगण्यात आले आहे. तसेच याआधी देखील आयआयटी मद्रास, आयआयटी मुंबई येथील अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले होते. पुण्यातील एफटीआयआयमधील दोन विद्यार्थ्यांनीही मागील वर्षी आत्महत्या केली होती.

FTII मधील आत्महत्या - सप्टेंबर 2022 मध्ये एका महिन्यात दोन विद्यार्थ्यांनी एफटीआयआयमध्ये आत्महत्या केली होती. शिक्षण घेणार्‍या एका 25 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. कामाक्षी बोहरा असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव होते. त्याच महिन्यात तरुणाने होस्टेलमध्ये आत्महत्या केली होती.

सिनीयरला कंटाळून आत्महत्या - वरिष्ठांच्या छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मेडिकलच्या विद्यार्थ्यीनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी त्यांनी केली. दुसरीकडे तेलंगणातील वारंगलमध्ये एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थीनीने देखील आत्महत्या केल्याची घटना घडली होती. सध्या कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.