ETV Bharat / state

नागपूर : आयसीयूमध्ये बेड मिळवून देण्याच्या नावाखाली महिलेची दीड लाखांनी फसवणूक; गुन्हा दाखल

author img

By

Published : May 12, 2021, 9:04 PM IST

Updated : May 12, 2021, 10:38 PM IST

नागपुरात कोरोनाचा हाहाकार सुरू असताना काही समाजसेवी मदतीसाठी पुढे येत आहेत. तर या संधीचा गैरफायदा घेऊन गरजू रुग्णांची फसवणूक करणाऱ्यांची संख्याही कमी नाही. नागपूर येथे राहणाऱ्या जयश्री नंदनवार या महिलेच्या सासूला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सक्करदरा परिसरातील खडतकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

woman cheated for getting bed in ICU in nagpur
अटक आरोपी

नागपूर - कोरोना रुग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शन्स आणि व्हेंटिलेटर बेड मिळवून देण्याच्या नावावर दीड लाखांत फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहरातील सक्करदरा पोलिसांनी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. निखिल आकोटे आणि संकेत कोरडवार अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत.

पोलाीस निरीक्षक याबाबत माहिती देताना.

काय आहे घटना?

नागपुरात कोरोनाचा हाहाकार सुरू असताना काही समाजसेवी मदतीसाठी पुढे येत आहेत. तर या संधीचा गैरफायदा घेऊन गरजू रुग्णांची फसवणूक करणाऱ्यांची संख्याही कमी नाही. नागपूर येथे राहणाऱ्या जयश्री नंदनवार या महिलेच्या सासूला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सक्करदरा परिसरातील खडतकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याठिकाणी त्यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये ऑक्सीजन बेडची गरज होती. त्याचवेळी निखिल आकोटे नावाचा एक तरुण जयश्री यांना खडतकर दवाखान्याच्या बेसमेंटमध्ये भेटला.

त्याने स्वतःची ओळख मेडिकल पीआरओ म्हणून करून दिली. आरोपी निखिलने आयसीयूमध्ये बेड मिळवून देण्याचे आश्वासन देऊन जयश्री यांच्याकडून १ लाख ६० हजार रुपये वसूल केले. या दरम्यान जयश्री यांच्या सासूची तब्येत खालावत असल्याने त्यांनी निखिलला बेड संदर्भात विचारणा केली तेव्हा तो उडवा-उडवीचे उत्तर देत होता. बेड मिळवण्यासाठी त्यांची वणवण सुरू असल्याना संकेत कोरडवार नावाच्या दुसऱ्या आरोपीने जयश्री यांना मोबाईलवर संपर्क केला. मी डॉक्टर बोलत असून तुमच्या रुग्णाला बेड संध्याकाळी उपलब्ध करून देतो, अशी थाप मारून त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. सर्व करुनही आयसीयूमध्ये बेड उपलब्ध नसल्याने चिंतित असलेल्या जयश्री यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी या संदर्भात सक्करदरा पोलीस ठाणे गाठून दोन्ही आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या आरोपींवर सक्करदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा - आता खासगी कंपन्या, गृहनिर्माण सोसायट्यांत होणार लसीकरण

दोन्ही आरोपींना आधीच अटक -

महत्वाचे म्हणजे यातील एक आरोपी सराईत गुन्हेगार आहे. त्या आरोपीने मेडिकलचा जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) तर दुसऱ्याने डाॅक्टर असल्याचे सांगितले होते. मात्र, दोन्ही आरोपींना आधीच सक्करदरा पोलिसांनी फसवणुकीच्या एका गुन्हात अटक केली होती. त्यांची रवानगी कारागृहात झाल्यामुळे आता सक्करदरा पोलीस त्यांचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहेत. यानंतर त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी अशाप्रकारे किती लोकांची फसवणूक केली याचा खुलासा होणार आहे.

हेही वाचा - पोलीस निरिक्षक पतीचा कोरोनाने मृत्यू, तिसऱ्याच दिवशी डॉक्टर पत्नी कामावर झाली रुजू

Last Updated : May 12, 2021, 10:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.