नागपूर - विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाप्रमाणेच दुसऱ्या दिवशीही विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामुळे सभागृहात गोंधळ झाल्याचे पहायला मिळाले.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होऊन २ दिवसांचा कालावधी लोटला आहे. मात्र, या काळात दोन्ही सभागृहात नाममात्र कामकाज होऊ शकले. सत्ताधारी आणि विरोधकांच्या संघर्षात विदर्भाचे मुद्दे मागे पडत असल्याची खंत अनेक आमदारांनी यावेळी बोलून दाखवली.
हेही वाचा - हिवाळी अधिवेशन : विधानपरिषदेमध्ये विरोधकांचा गोंधळ, सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब
विदर्भाचे प्रश्न सोडवण्यासाठी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे घेतले जायचे, मात्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सुरू असलेल्या गोंधळामुळे मूळ मुद्दाच विस्मरणात गेल्याचे जाणवत आहे. याबाबत बोलताना भाजप आमदार कृष्णा खोपडे म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे हे तिकडम सरकार आहे. त्यांनी आधी जी आश्वासनं दिली त्यावर एक महिना उलटुनही अद्याप कुठलेच पाऊल उचलण्यात आले नाही. तर, हिवाळी अधिवेशनातून विदर्भातील शेतकऱ्यांना, बेरोजगार युवकांना काहीतरी मिळेल अशी आशा आहे. मात्र, म्हणाले, गेल्या दोन दिवसातील सभागृहाची परिस्थिती पाहता विदर्भाचा मुद्दा मागेच राहते की काय अशी परिस्थिती असल्याचे चित्र आहे असे काँग्रेस आमदार विकास ठाकरे म्हणाले.
हेही वाचा - नागपूर हिवाळी अधिवेशन : शेतकऱ्यांच्या मुद्यावरून विधानसभेत जोरदार गोंधळ