नागपूर - देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी नागपुरात क्रिकेटचा आनंद घेतला. यावेळी त्यांनी मैदानावर केलेली फटकेबाजीही नागपूरकरांना पाहायला मिळाली. त्यांनी तब्बल 3 चौकारांसह 18 धावा काढल्या. त्यानंतर त्यांनी नागपुरातील जुन्या आठवणींना उजाळा दिला.
शहरातील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (VCA) मैदानावर जजेस (न्यायाधीश) इलेव्हन विरुद्ध अॅडव्हॉकेट इलेव्हन यांच्यात क्रिकेट सामना खेळण्यात आला. या सामन्यात जजेस इलेव्हनकडून फलंदाजी करताना देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी 30 चेंडूत 18 धावा केल्या आहेत. या मध्ये त्यांनी 3 चौकार लगावले. 18 च्या वैयक्तिक धावसंख्येवर असताना सरन्यायाधीश शरद बोबडे बाद झाले, त्यानंतर आमचे प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी त्यांच्या सोबत खास बातचीत केली..
न्यायव्यवस्थेमधील दोन्ही अंग निरोगी आणि सुदृढ रहावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठाचे न्यायाधीश रवी देशपांडे यांनी पुढाकार घेऊन हा क्रिकेट सामना आयोजित केला होता.
यावेळी त्यांनी नागपूर सुंदर आणि रमणीय शहर आहे. या शहराने अनेक मोठ्या व्यक्तींना घडवले आहे. या सारखे सुंदर शहर भारतातील मोजक्याच ठिकाणी असल्याच्या भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.