नागपूर - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह धरणातील जलसाठा वाढल्यानंतर नागपूरकरांवरील पाणी कपातीचे संकट 15 दिवसांसाठी टळली आहे. गणेशोत्सवाच्या काळात पाणी कपात होणार नसली, तरी त्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेतल्या नंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
नागपुरामध्ये पाणीकपातीचा निर्णय 15 दिवसांसाठी स्थगित करण्यात आला आहे. गणेशोत्सव आणि सणासुदीचे दिवस असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 15 दिवसानंतर पुन्हा आढावा घेऊन यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने महापालिकेने एक दिवसाआड पाणी कपातीचा निर्णय घेतला होता. मध्य प्रदेश सरकारने बांधलेल्या चौराई धरणामुळे तोतलाडोह आणि नवेगाव खैरी या नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचे पाणी अडवले जात आहे. मात्र, मध्य प्रदेश मध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे चौराई धरण 92 टक्के भरले आहे. त्यामुळे या धरणातून पाणी सोडल्याने तोतलाडोह 33 टक्के तर नवेगाव खैरी 28 टक्के भरले आहे. त्यामुळे 15 दिवसांसाठी पाणीकपातीचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे.