ETV Bharat / state

VIDEO : नागपूरकर सावधान..! पाणी पुरीत होतोय डबक्यातील पाण्याचा वापर

author img

By

Published : Sep 12, 2019, 8:15 AM IST

Updated : Sep 12, 2019, 8:21 AM IST

हा पाणीपुरी विक्रेता शहरातील गुरुदेवनगर चौकात पाणीपुरीचा ठेला लावतो. ठेल्याच्या समोरच्या भागातील रस्त्यावरील एका खड्ड्यात पावसाचे पाणी साचले असता या महाशयाने सर्वांची नजर चुकवून ते पाणी एक डब्यात भरले. तसेच याच घाणेरड्या पाण्याने डब्बा भरल्यानंतर तो थेट ते पाणी घेऊन पाणीपुरीच्या गाडीवर पोहचला.

शहरातील नंदनवन येथील गुरुदेवनगर चौक येथे हा पाणीपुरीवाचा ठेला लागतो.

नागपूर - शहरात नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आपण आवडीने खात असलेल्या पाणीपुरीचे पाणी चक्क डबक्यातील पाण्याचा वापर करून तयार करण्यात येत असल्याचे समोर आला आहे. शहरातील नंदनवन येथील गुरुदेवनगर चौकातील पाणीपुरीवाला रस्त्यावर जमा झालेल्या डबक्यातील पाण्याचा यासाठी वापर करण्यात येत आहे. या प्रकाराचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

धक्कादायक.... नागपुरामध्ये पाणी पुरीत होतोय डबक्यातील पाण्याचा वापर

हेही वाचा - धक्कादायक.. नंदुरबारमध्ये गणेश विसर्जनावेळी एकाच कुटुंबातील सहा तरुणांचा तलावात बुडून मृत्यू

हा पाणीपुरी विक्रेता शहरातील गुरुदेवनगर चौकात पाणीपुरीचा ठेला लावतो. ठेल्याच्या समोरच्या भागातील रस्त्यावरील एका खड्ड्यात पावसाचे पाणी साचले असता, या महाशयाने सर्वांची नजर चुकवून ते पाणी एका डब्यात भरले. तसेच याच घाणेरड्या पाण्याने डब्बा भरल्यानंतर तो थेट ते पाणी घेऊन पाणीपुरीच्या गाडीवर पोहोचल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येते.

यानंतर या पाण्याचा उपयोग त्याने थेट गुपचूपचे (पाणीपुरीचे) पाणी तयार करण्यासाठी वापरले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ होत असल्याच्या या धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

याच्याआधीही अनेकदा खाद्य पदार्थांमध्ये अळ्या असल्याच्या घटना घडल्या. यानंतर आतादेखील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आता अन्न सुरक्षा प्रशासन या प्रकरणी काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - धक्कादायक...पालावर आयुष्य जगणाऱ्या लंकाबाई 17 व्या वेळी गर्भवती; बीड जिल्ह्यातील प्रकार

Intro:नागपूरच्या नंदनवन येथील गुरुदेवनगर चौक येथे पाणीपुरीवाला रस्त्यावर जमा झालेल्या डबक्यातील पाण्याने पाणी-पुरी चे पाणी तयार करत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ वायरल झाला आहेBody:हा पाणी-पुरीचा ठेला गुरुदेव नगरच्या चौकात उभा आहे...ठेल्याच्या समोरच्या भागातील रास्तावरील एक खड्यात पावसाचे पाणी साचलेले आहे...पाणी पुरी विक्रेता सर्वांची नजर चुकवून ते पाणी एक डब्यात भरताना दिसत आहे...घाणेरड्या पाण्याने डब्बा भरल्यानंतर तो थेट ते पाणी घेऊन पाणी-पुरीच्या गाडीवर पोहचल्याचे व्हिडीओ मध्ये दिसून येतोय...या पाण्याचा उपयोग हा पाणी-पुरी विक्रेता थेट गुपचूप चे पाणी तयार करण्यासाठी उपयोगात आणता असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे...यावर आता अन्न सुरक्षा प्रशासन काय कारवाई करतो या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे Conclusion:
Last Updated : Sep 12, 2019, 8:21 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.