ETV Bharat / state

Flight Emergency Landing : प्रवासादरम्यान चिमुकलीची तब्येत अचानक बिघडली, नागपुरात विमानाचं इमर्जन्सी लँडिंग - Emergency landing Nagpur Airport

बंगळुरुहून दिल्लीसाठी जात असलेल्या विमानातील एका दीड वर्षीय चिमुकलीची तब्येत अचानक प्रवासादरम्यान खालावली. त्यामुळं विमानाचं नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं.त्यानंतर लगेच चिमुकलीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. (Vistara Flight Emergency Landing) (Flight Emergency Landing Nagpur Airport)

Delhi Vistara Flight
विमानाची इमर्जन्सी लँडिंग
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 28, 2023, 10:43 PM IST

नागपूर : 'विस्तारा एअरलाइन्स'च्या विमानात अवघ्या दीड वर्षीय चिमुकलीची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळं विमानाचं नागपूरच्या विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावं लागलं. त्या चिमुकलीला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, तिची प्रकृती नाजूक असली तरी धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे. बंगळुरुहून दिल्लीला निघालेल्या विमानात ही घटना घडली. (Vistara Flight Emergency Landing) (Flight Emergency Landing Nagpur Airport)

दीड वर्षाच्या चिमुकलीला श्वास घेण्यास अडचण : विमानानं उड्डाण घेतल्यानंतर दीड वर्षाच्या चिमुकलीला श्वास घेण्यास अडचणी येत होत्या. गुदमरल्यासारखं होत आहे हे लक्षात येताच वैमानिकानं लगेच एअर ट्राफिक कंट्रोल रूमशी संपर्क साधला. त्यानंतर विमान नागपूर विमानतळाच्या दिशेनं वळवण्यात आलं. विमानाची नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. चिमुकलीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विमानात होते पाच डॉक्टर : बंगळुरुहून दिल्लीला निघालेल्या या विमानात पाच डॉक्टरसुद्धा प्रवास करत होते. चिमुकलीची तब्येत खालावल्याचं लक्षात येताचं डॉक्टरांनी तिच्यावर प्राथमिक उपचार केले. यामुळं चिमुकलीचा जीव वाचला आहे. विमा लँड झाल्यानंतर त्या चिमुकलीला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग : याआधीही नागपूर विमानतळावर विमानाचं आपत्कालीन लॅंडिंग करण्यात आलं होतं. ही लँडिंग 21 ऑगस्टला रात्री आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली होती. मुंबईवरून रांचीला जात असलेल्या विमानातील एका प्रवाशाची तब्येत अचानक खालावल्यानं, विमानाची नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली होती. या प्रवाशाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. देवानंद तिवारी असं मृत प्रवाशाचं नाव होतं. देवानंद तिवारी हे सीकेडी आणि क्षयरोगानं आजारी होते. विमान (विमान क्रमांक 6E 5093) मुंबईहून रांचीला जात असताना या प्रवाशाची विमानात मोठ्या प्रमाणात रक्ताची उलटी झाली होती.

हेही वाचा -

CM helicopter break down : मुख्यमंत्र्यांचे साताऱ्यात इमर्जन्सी लँडिंग, महाबळेश्वर दौरा सोडून विश्रामगृहावर रवाना

Army Parachute Emergency Landing: श्रीगंगानगरमध्ये लष्कराच्या पॅराशूटचे इमर्जन्सी लँडिंग, हवेत उड्डाण केले अन् गॅस संपला

Emergency Helicopter Landing Kolhapur : वायुसेनेच्या एमआय 8 हेलिकॉप्टरचे कोल्हापुरात इमर्जन्सी लँडिंग; मोठी दुर्घटना टळली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.