ETV Bharat / state

रावणाने नागपुरातील 'या' कुटुंबाच्या जगवल्या सात पिढ्या - रावणाचा प्रतिकात्मक पुतळा

हेमराजसिंग बिनवार यांनी तयार केलेल्या रावणाला केवळ नागपूरचं नाही तर मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठी मागणी असायची. एवढेच काय तर हेमराजसिंग बिनवार यांनी तयार केलेले रावण मुंबईला सुद्धा पाठवले जायचे. मात्र गेल्या दोन वर्षात सारे काही बदलून गेले आहे.

रावणाचा पुतळा
रावणाचा पुतळा
author img

By

Published : Oct 14, 2021, 7:58 AM IST

नागपूर - असत्यावर सत्याचा विजय म्हणून विजयादशमीला रावणदहन करण्याची सांस्कृतिक परंपरा आपल्या देशात आहे. वाईट प्रवृत्तीचा नाश व्हावा याकरिता देखील रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले जाते. मात्र नागपूर शहरातील महाल भागात राहणाऱ्या बिनवार कुटुंबासाठी रावण हा त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. बिनवार कुटुंबाने रावण तयार करण्याची कला सहा पिढ्यांपासून जोपासली आहे. मात्र कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर रावण पुतळ्याच्या मागणीत मोठी घट झालेली आहे. गेल्यावर्षी सार्वजनिकरित्या दसरा साजरा करण्यावर शासन आणि प्रशासने निर्बंध लावले होते. यावर्षी सुद्धा रावण दहन करण्याच्या संदर्भात शासनाकडून कोणतेही दिशानिर्देश मिळाले नसल्याने यंदाही रावण तयार करण्याच्या मागणीमध्ये तब्बल ९० टक्के घट झाली आहे. आपली कला जिवंत राहावी म्हणून बिनवार कुटुंबाने सहा प्रतिकात्मक रावण तयार केले आहेत.

रावणाने नागपुरातील 'या' कुटुंबाच्या जगवल्या सात पिढ्या

रावनामुळेचं समाजात ओळख -

रावणाने आम्हाला समाजात ओळख दिली, रोजगार दिला. आमच्या संपूर्ण कुटुंबाचे भरणपोषण देखील केले. एवढेच नाही तर आजवर आमच्या सहा पिढ्या सुद्धा रावणानेच जगवल्या. आमच्याकरिता रावण म्हणजे पालनकर्ता आहे. मात्र आता परिस्थितीनुसार रावणाचा देखील नाईलाज झाला आहे. सध्या कोरोनामुळे सन-उत्सव साजरे करण्यावर निर्बंध आले आहेत. त्यामुळे रावण तयार करण्याचे ऑर्डर्स देखील मिळत नाही. मात्र आपली संस्कृती जपण्यासाठी आणि कला जिवंत ठेवण्यासाठीच बिनवार कुटुंबाने काही रावण तयार केले आहेत.

रावणाचा पुतळा
रावणाचा पुतळा

मध्य भारतात मोठी मागणी -

हेमराजसिंग बिनवार यांनी तयार केलेल्या रावणाला केवळ नागपूरचं नाही तर मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठी मागणी असायची. एवढेच काय तर हेमराजसिंग बिनवार यांनी तयार केलेले रावण मुंबईला सुद्धा पाठवले जायचे. मात्र गेल्या दोन वर्षात सारे काही बदलून गेले आहे. आता कोणीही रावण तयार करून द्या असे म्हणत नाही. आजपर्यंत आमच्या सहा पिढ्या रावणाने जगवल्या. मात्र पुढे ही कला जिवंत कशी ठेवायची हा मोठा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाला असल्याचे अमरसिह बिनवार म्हणाले आहेत. त्यामुळे शासनाने आम्हाला मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा बिनवार यांनी व्यक्त केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.