नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काल पडलेली उभी फूट अनपेक्षित होती असे म्हणणे गैर आहे. सर्वांना याबाबत पूर्व कल्पना होती. म्हणूनच शरद पवार यांच्याकडून समजूत काढण्याचे प्रयत्न हे सातत्याने सुरू होते. अजित पवार गेली अनेक वर्षे सत्तेत होते. विविध पदे त्यांनी भूषवली असताना छोट्या मोठ्या गोष्टींवरून पक्षात बंडखोरी करण्यासाठी काही कारण नाही. त्यांना सत्तेत सहभागी व्हायचे होते हे आधीच निश्चित झाले होते. राष्ट्रवादीतील काही नेते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत असे म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांच्या शपथविधीवर टीका केली आहे. शरद पवार हे महविकास आघाडी सोबत राहतील असे देखील वडेट्टीवार म्हणाले आहे.
सरकार सुरक्षित करण्याचा प्रयत्न : एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून येणार अधिवेशन शेवटचे असेल असे भाकीत विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. अध्यक्षांना आमदार अपात्रतेच्या बाबतीत लवकर निर्णय हा घ्यावाच लागेल. त्यामुळे सरकार सुरक्षित करण्याचा हा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले आहेत. पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार केला तर स्फोट होईल, काल अनेकांचे चेहरे फसगत झाली असे होते. यामुळे काँग्रेसचे चांगले दिवस आता येतील असे देखील ते म्हणाले आहेत.
दोन्ही उपमुख्यमंत्री टेरर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे दोन्ही नेते स्वभावाने टेरर आहेत. ते आपल्या ध्येयापासून डगमगणारे नाहीत. त्यामुळे काम करत असताना ते दोन्ही दोन दिशेला जातील तेव्हा दोघांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो अशी शक्यता वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.
देवेंद्र फडणवीस दिल्लीत जातील का : भाजप नेत्यांना एकसंध ठेवण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. त्याच्या नंतर हे काम अगदी ताकदीने करणारा नेता भाजपकडे राज्यात नाही. सध्या देवेंद्र फडणवीस दिल्लीत जातील अशी चर्चा असली तरी सध्याच्या परिस्थितीत हे कठीण दिसत असले तरी या संदर्भात ते स्वतःचा सांगू शकतील असे ते म्हणाले आहेत.
हेही वाचा :
- Nana Patole on NCP Crisis : महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारी घटना घडलेली आहे - नाना पटोले
- Maharashtra Political Crisis: अजित पवार आणि इतर 8 आमदारांना अपात्र ठरवण्याच्या राष्ट्रवादीच्या याचिकेवर योग्य ती कारवाई करू- राहुल नार्वेकर
- Sanjay raut on maharashtra politics crisis : मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांना हटविण्यात येणार, 16 आमदार ठरणार अपात्र : संजय राऊत