ETV Bharat / state

नागपूरच्या ऐतिहासिक सभेतून काँग्रेस पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकणार - विजय वडेट्टीवार - लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकणार

Vijay Wadettiwar Reaction : १९२० साली नागपूर येथे काँग्रेस पक्ष स्थापना दिवसाची सभा (Congress Foundation Day Meeting) झाली होती. काँग्रेसची स्थापना १८८५ मध्ये पक्षाची स्थापना झाल्यानंतर विदर्भ आणि मध्य भारतात काँग्रेस बळकट व्हावी या दृष्टीने १९२० स्थापना दिवसाची पहिली सभा झाली होती. त्या सभेला १०३ वर्ष पूर्ण झाले आहेत अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिलीय.

Vijay Wadettiwar
विजय वडेट्टीवार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 25, 2023, 10:06 PM IST

नागपूर Vijay Wadettiwar Reaction : काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिवसाच्या (Congress Foundation Day) निमित्ताने देशभरातील काँग्रेसचे नेते नागपूरच्या ऐतिहासिक अश्या सभेला उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह गांधी कुटुंबातील आणखी काही नेते सुद्धा उपस्थित राहणार आहेत. नागपूर येथील सभेच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शंखनाद काँग्रेस करणार आहे. त्या दृष्टीकोनातून तयारी सुरू असल्याचा दावा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय ते आज सभा स्थळाची पाहणी करत असताना नागपुरात बोलत होते.

काँग्रेससाठी विदर्भ म्हणजे नवसंजीवनी : काँग्रेसच्या स्थापना दिवसाची सभा ही विदर्भात होत आहे. विदर्भ कायम काँग्रेसच्या मदतीला धावलेला आहे. विदर्भाने काँग्रेस पक्षाला कायम नव्याने उभारी देण्याचं काम केलं, त्यामुळं या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आत्तापर्यंत झालेल्या सभेपैकी नागपूरची सभा ऐतिहासिक आणि भव्य होईल. लोकांमध्ये सुद्धा उत्सुकता असल्याचं वडेट्टीवार म्हणाले आहे.

मध्यभारतातुन काँग्रेसजण येणार : या सभेत नागपूर, विदर्भ, मराठवाडासह संपूर्ण महाराष्ट्र येथून काँग्रेसजण तर येतीलचं परंतु तेलंगाना आणि छत्तीसगड, मध्यप्रदेश यासह देशभरातून मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस प्रेमी सहभागी होणार आहे असा दावा वडेट्टीवार यांनी केलाय.

देश इलेक्शन मोडवर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपला देश इलेक्शन मोडवर आलेला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता दोन किंवा अडीच महिन्यामध्ये लागेलचं. अशा स्थितीमध्ये देशात एक संदेश जावा की, काँग्रेस पक्ष भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई लढण्यास तयार आहे. काँग्रेस हुकुमशाही विरोधात लढण्यास ही तयार आहे. काँग्रेस संविधान वाचवण्यास, बेरोजगारांसाठी, शेतकऱ्यांनच्या हिताचे रक्षण करण्यासाठी तयार असल्याचा संदेश देण्यासाठी तयार आहे. हे सांगण्यासाठी नागपूरची सभा महत्वाची असेल असं वडेट्टीवार म्हणाले आहेत.

यांनी श्रद्धेचा बाजार मांडलाय : रामलल्ला कुणाची खाजगी प्रॉपर्टी नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहे. त्याचं समर्थन विजय वडेट्टीवार यांनी देखील केलंय. जो मानतो त्या सर्वांचा देव आहे. कुणी याचा बाजार मांडला तर कुणी श्रध्दा ठेवली आहे.

लोक बदला घेण्यासाठी उत्सुक : नुकताचं पुढे आलेले एका सर्वेतून लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला नुकसान होत असल्याचं चित्र दाखवण्यात आलं आहे. या संदर्भात बोलताना विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, दुसऱ्यांच घर फोडून स्वतःचं घर सजवणाऱ्यांना याचं नुकसान भोगावे लागणारच आहे. दुसऱ्यांचे पक्ष फोडून सत्ता स्थापन केली हे लोकांना आवडलेलं नाही. याचा बदला घेण्याकरता लोक उत्सुक आहेत असा दावा देखील त्यांनी केलाय.

हेही वाचा -

  1. विरोधी खासदार निलंबन प्रकरणी विजय वडेट्टीवारांची केंद्रावर टीका; म्हणाले 'बेशरमपणाचा कळस'
  2. विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा न करता सरकारचा अधिवेशनातून पळ - विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल
  3. Vijay Wadettiwar Death Threat: विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी, गृहमंत्र्यांना पत्र लिहून 'ही' केली मागणी

प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.