नागपूर - विधानपरिषदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा आज(शुक्रवार) पाचवा दिवस आहे. मागील दोन दिवसात राहिलेल्या लक्षवेधी आज मांडल्या जाणार आहेत. सकाळी 10 वाजता कामकाजाला सुरुवात झाली आहे.
UPDATES -
कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावण्यासाठी प्रयत्न केले जातील - मंत्री एकनाथ शिंदे
- 6.05 PM - सुरेश धस - देवेंद्र फडणवीसांनी 23.66 टीएमसी उस्मानाबाद बीड जिल्ह्याला दिले. कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेला तडीस न्यावे... बीड-लातूरृ-उस्मानाबाद जिल्ह्यात एकही विमा कंपनी पुढे आली नाही... शेतकऱ्यांचे विम्याचे पैशे लवकरात लवकर मिळावे, शेतकरी अवकाळी पावसाने संकटात... रानटी जनावरांनी केलेल्या नुकसानाचा समावेश पीक विम्यात करावा... शेतकऱ्यांना तुम्ही जे आश्वासन दिले ते पूर्ण करा... गुन्हेगारी आटोक्यात आणावी.
- 5.55 PM - सत्ताधारी पक्षाने मांडलेला प्रस्ताव चुकीचा - सुरेश धस ...अनेक प्रकल्पांना तुम्ही दिलेली स्थगिती ... आम्ही औचित्याचे मुद्दे मांडले मात्र, सरकारने काहीच उत्तर दिले नाही... राज्यापालांच्या अभिभाषणावर उत्तर देता येत नाही मात्र, विरोधी पक्ष म्हणून एकच अस्त्र... कॉमन मिनिमम प्रोग्रामसोबत अमर अकबर अँथनी म्हणून तुम्ही सोबत... बघूया तुमचा संसार किती दिवस चालतो... अमिताभ बच्चन ती ट्रिपल भूमिका असलेला महान चित्रपट चालला नाही मात्र, एकच सिंगल भूमिका असलेला कालिया चित्रपट चालला; महाविकास आघाडीला टोला... आतापर्यंत आघाडीच्या सरकारने दुधाच्या धंद्याला खाडी आणली. तुम्ही जे अनुदान दिले ते दुधाच्या कनवर्जनला दिले... 5 रू. अनुदान थेट दुध व्यापारी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करणारे युतीचे पहिले सरकार आमचे होते,.. धनंजय महाडिक यांना फक्त 50 कोटीची थकहमी दिली... भाजप-शिवसेनेच्या दुधाच्या संस्था नाही....तर आघाडीच्या नेत्यांचे दुधाचे व्यवसाय आहेत. मात्र, फडणवीसांनी भेदभाव न करता अनुदान दिले... आमची विनंती दुधाचे अनुदान शेतकऱ्याला द्या ही विनंती - सुरेश धस
- 3.30 नंतर अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला जाईल
- लक्षवेधी मागण्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
- 3.30 पर्यंत विधानपरिषद स्थगित
- कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावण्यासाठी प्रयत्न केले जातील - मंत्री एकनाथ शिंदे
- मंत्र्यांच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू
- अर्धा तास कामकाज स्थगित, लक्षवेधी उद्या मांडणार
- विधीमंडळ परिसरात आमदारांचे फोटो सेशन सुरू
- विधानपरिषदेच्या कामकाजाला सुरुवात
चौथ्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेनंतर सरकारच्यावतीने मंत्री सुभाष देसाई यांनी उत्तर दिले होते. पण, यात 25 हजार हेक्टरी मदतीच्या मागणीवर ते काहीच न बोलल्याने विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांसह इतर सदस्यांनी गदारोळ करत सभागृहातून निघून गेले. यामुळे आजही याचे पडसाद पडणार आहेत.
दुपारनंतर मंत्रिमंडळाच्यावतीने करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांवर चर्चा होणार आहे. त्यानंतर शासकीय विधेयकावर चर्चा होऊन त्यानंतर शेवटच्या टप्प्यात अशासकीय विधेयक विरोधकांकडून मांडले जाणार आहे. यात लोकसेवेतील विविध रिक्त पदे आणि यावर विशेष मागास प्रवर्गातील आरक्षण, एमपीएससीत विशेष मागासवर्ग आणि इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षणात सुधारणा विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे.