ETV Bharat / state

Murder Live Video : दिलीप सोनटक्के हत्या प्रकरण; हत्येचा लाईव्ह व्हिडिओ आला समोर

नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात पेट्रोल पंप मालकाची हत्या करण्यात आली होती. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. तीन आरोपींनी ऑफीसमध्ये घुसून त्यांची हत्या केली होती. त्याचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी भरदिवसा तीन आरोपींची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आली होती.

author img

By

Published : May 20, 2023, 5:49 PM IST

Dilip Sontakke Murder
Dilip Sontakke Murder
हत्येचा लाईव्ह व्हिडीओ

नागपूर : दोन दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथे पेट्रोल पंप मालकाची निर्घृण हत्या झाली होती. हत्येच्या घटेनचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. ज्यामध्ये दिलीप सोनटक्के हे पेट्रोल पंपाच्या कार्यालयात बसले असताना ३ युवकांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. आरोपींनी धारधार शस्त्रांनी दिलीप सोनटक्के यांच्यावर सुमारे शंभर वार केले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी हे पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यातील एक आरोपी हा परत आला. त्याने जमिनीवर कोसळलेल्या दिलीप सोनटक्के यांच्यावर परत वार केले. अंगाचा थरकाप उडवून टाकणारा हा व्हिडीओ असून याच्या आधारे पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

विवाहबाह्य संबंधातून हत्या : ६० वर्षीय दिलीप सोनटक्के यांची विवाहबाह्य संबंधातुन हे हत्याकांड घडल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी उमरेड भागात एक फ्लॅट देखील खरेदी केला होता. तिथे ते एका महिले सोबत राहत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. नेमकी ती महिला कोण आहे या संदर्भात मात्र, अद्याप खुलासा झाला नाही. या हत्येशी तिचा संबंध आहे का याबाबत ही पोलिसांनी माहिती उघड केलेली नाही.

तीन आरोपींना अटक, तपास सुरू : या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. यामध्ये शेख अफरोज ऊर्फ इमरान वल्द शेख हनिफ (वय ३३), मोहम्मद वसीम ऊर्फ सोनू वल्द लाल मोहम्मद (२८), शेख जुबेर शेख कय्युम (२५) यांचा समावेश आहे. तिन्ही आरोपींना पाच दिवसांची कोठडी मिळाली आहे. घटनेत वापरलेला चाकू, बंदूक व बॅग उमरेड परिसरातून जप्त करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे पोलिसांनी अंतर्बाह्य संबंधाच्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे.

महत्वाच्या बातम्या -

  1. Nana Patole News: मंत्रीमंडळ विस्तारात मंत्रीपदासाठी आता बोली लागणार काय? - नाना पटोले
  2. 2000 Note Ban : नोट बंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करण्याची भाजपची पद्धतशीर योजना - धंगेकर
  3. KCR On BRS Model In Country : विकासाचे बीआरएस मॉडेल भारतभर नेणार; बीआरएसने सुरू केली 288 मतदार संघात लढण्याची तयारी - केसीआर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.