ETV Bharat / state

'वीज तोडायला येणाऱ्यांचे पाय तोडू'! विदर्भवादी नेते राम नेवले यांचा इशारा

author img

By

Published : Dec 7, 2020, 3:29 PM IST

कोरोना काळात सर्वसामान्य नागरिकांना अतिरिक्त वीजबिले देण्यात आली. यामुळे अगोदरच संकटात असलेले नागरिक आणखी आर्थिक संकटात गेले. याविरोधात आता विदर्भ राज्य आंदोलन समिती आक्रमक झाली आहे.

Agitation
आंदोलन

नागपूर - वीज वितरण कंपन्यांनी कोरोना काळात सर्वसामान्य नागरिकांना वीज दरवाढीचा चटका दिला होता. या विरोधात गेल्या काही महिन्यांपासून राजकीय पक्षांसह 'विदर्भ राज्य आंदोलन समिती'कडून आंदोलने केली जात आहेत. आज नागपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या व्हेरायची चौकात राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर विदर्भवाद्यांनी ठिय्या आंदोलन केले. विदर्भातील शंभर ठिकाणी आंदोलन करण्यात आल्याचा दावा विदर्भावाद्यांनी केला आहे. कोरोना काळातील २०० युनिट पर्यंतचे वीज बिल माफ केल्यानंतर उर्वरित बिल अर्ध्या दराने आकारण्यात यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

विदर्भवादी नेते राम नेवले यांनी आक्रमक इशारा दिला आहे

कोरोना काळात सर्वसामान्य नागरिकांना आलेल्या वाढीव वीज बिलांचा मुद्दा हाताशी धरून भाजपाकडून आंदोलने केली जात आहेत. वीज बिलांविरोधात विदर्भवाद्यांनीही सातत्याने आंदोलने केली आहेत. विदर्भावाद्यांनी या अगोदर ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतळे जाळून आपला रोष व्यक्त केला आहे. गेल्याच महिन्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून वीज बिलांचा मुद्दा हाताशी धरून आंदोलन केले होते. त्यावेळी विदर्भावाद्यांनी सुद्धा आंदोलन केले होते. आज पुन्हा विदर्भावाद्यांनी वीज बिलांच्या विरोधात आंदोलन केले.

वीज तोडणाऱ्यांचे पाय तोडले जाणार - राम नेवले

कोरोना काळात आलेल्या वाढीव वीज बिलांचा भरणा न करणाऱ्या ग्राहकांचे कनेक्शन तोडले जाणार असल्याचा इशारा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिला आहे. विदर्भवाद्यांनी यावर जोरदार आक्षेप नोंदवला आहे. वीज कनेक्शन तोडण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पाय तोडण्याचे काम विदर्भवादी करणार असल्याचा इशारा विदर्भवादी नेते राम नेवले यांनी दिला आहे.

ऊर्जा मंत्र्यांच्या घराला घालणार घेराव -

गेल्या काही महिन्यांपासून विदर्भावाद्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची दखल अद्यपाही राज्य सरकार आणि ऊर्जा मंत्रालयाने घेतलेली नाही. सातत्याने सुरू असलेल्या आंदोलनाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या ४ जानेवारीला ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या घराला घेराव टाकण्याचा इशारा विदर्भावाद्यांनी दिला आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.