नागपूर - वेगळा विदर्भासह अन्य मागण्यांसाठी विदर्भ राज्य समितीच्या वतीने बससमोर जाऊन रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. गणेशपेठ बसस्थानकासमोर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला आंदोलकांनी रस्त्यावर झोपून आंदोलन केल्याने त्यांना ताब्यात घेताना पोलिसांची भंबेरी उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने वेगळा विदर्भ, कोरोना काळातील वीज बिल माफी, पेट्रोल डिझेलची दरवाढ मागे घ्यावी यासह अन्य आंदोलन करण्यात आले. ऑगस्ट क्रांती दिनापासून स्वातंत्र्य दिनापर्यंत वेगवेगवेगळे आंदोलन केले होते. याच आंदोलनाचा दुसरा टप्पा आजपासून रस्ता रोको, जेलभरो आंदोलन सुरू करण्यात आला. यामध्ये विदर्भावाद्यांनी गणेशपेठ परिसरात एकत्र येत हातात फलक घेऊन सरकार विरोधात घोषणा दिल्या. यानंतर बसस्थानकाकडे जात बस अडवत आंदोलन सुरू केले. यावेळी काहींनी बसवर चढून तर काहींनी बससमोर बसून आंदोलन केले. गणेशपेठ पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
महिला आंदोलकांना ताब्यात घेताना पोलिसांची दमछाक
यावेळी काही महिला पदाधिकारी दटून राहिल्याने त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. यावेळी महिला पोलीस त्यांना अटक करण्याच्या प्रयत्नात पोलिसांची दमछाक झाली. काही करता महिला आंदोलक जागा सोडत नव्हत्या प्रतिकार करत त्यानी आंदोलन सुरुच ठेवले. यावेळी काही महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी अखेर उचलून घेत त्यांना पोलीस वाहनात बसवले आणि गणेशपेठ पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
नेत्यांनी गावबंदीचा इशारा
आतापर्यंत भाजपने विदर्भातील जनतेची दिशाभुल केली आहे. यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागणीकडे लक्ष दिले नाही. त्यांना विदर्भात गावबंदी करू, असा इशारा दिला. तसेच ऊर्जामंत्री राऊत यांनीही वीज बिल माफी दिली नाही तर त्यांनाही गावबंदीचा इशारा मुख्य संयोजक राम नेवले यांनी दिला आहे.
हे आंदोलन विदर्भ राज्य आंदोलन समीतीचे मुख्य संयोजक राम नेवले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी युवा आघाडीचे विदर्भ अध्यक्ष मुकेश मसुकरकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा विनिता येरने, ज्योती खांडेकर यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
काटोल येथेही आंदोलन
काटोल येथेही तहसील कार्यलयासमोर काटोल-नागपूर महामार्गावर विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने रस्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी हे आंदोलन विदर्भ राज्य आघाडीचे कोअर कमिटीचे सदस्य सुनील वडस्कर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा युवा आघडीचा अध्यक्ष वृषभ वानखडे, निलेश पेठे, दत्ताजी धवळ, प्रभाकर वाघ यांसह अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
या आहेत मुख्य मागण्या
- वेगळा विदर्भ करावा
- कोरोना काळातील वीज बिल माफ करावे
- पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागे घ्यावी
हेही वाचा - कोराडी पोलिसांनी घातला नवा आदर्श... पोलीस ठाण्याच्या आवारात फुलवली परसबाग