नागपूर - वीज बिलात सातत्याने वाढ होत आहे. वीज बिलावर लावलेला प्रचंद भार आणि अधिभारामुळे विदर्भतील जनतेची लूट सुरू आहे. सरकारच्या या धोरणाविरोधात विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे ऊर्जामंत्री बावनकुळेंच्या घरावर मोर्चा काढण्यात आला होता.
औष्णिक वीज प्रकल्प हे विदर्भात आहेत. जमीन आणि पाणी विदर्भतील वापरले जाते. तसेच वीज निर्मितीसाठी प्रदूषणदेखील इथेच होते आणि विदर्भातील जनतेलाच अधिकचे वीज बिल द्यावे लागत आहे. त्या मुळे विजदर निम्मे करावेत. शेती पंपाचे बिल माफ करावे, भारनियमन संपवावे आणि एसएनडीएल वीज कंपनी बरखास्त करावी, या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.
वीज बिलासंदर्भात मार्च महिन्यात ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यांनी विदर्भ आंदोलन समितीच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य करण्यासाठी पुढील दोन महिन्यांचा वेळ मागितला होता. त्यामुळे ३ जूनपर्यंत समितीने आंदोलन पुढे ढकलले होते.मात्र, त्यांनी दिलेला कालावधी संपून ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. तरी त्यावर अंमलबजावणी करण्यात आली नाही. म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समितीने ऊर्जा मंत्र्यांचे निवास स्थानच घेरले.