नागपूर VHP To Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल (बुधवारी) प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद आज राज्यात उमटू लागले आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत मूर्खातापूर्ण आहे. (Vishwa Hindu Parishad) यापेक्षा जास्त मूर्खातापूर्ण दुसरं व्यक्तव्य होऊ शकत नाही. पूर्ण देशात राममय वातावरण झालं आहे. ते जाणीवपूर्वक रामाचा अपमान करीत आहेत. समाज त्यांना कधीही माफ करणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय महामंत्री गोविंद शेंडे यांनी दिलीय. ते नागपुरात बोलत होते. (Govind Shende)
आमची लीगल चर्चा सुरू : हिंदूंच्या श्रद्धेवर आघात केल्यास समाज कधीही माफ करणार नाही. आमची लीगल चर्चा सुरू आहे. ठिकठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करू. त्यांना आम्ही सोडणार नाही, असा इशारा देखील गोविंद शेंडे यांनी दिला.
डिवचण्यासाठी केलेलं वक्तव्य : आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जाणूनबुजून हे वादग्रस्त वक्तव्य केलं. देशात राममय वातावरणाची निर्मिती होत असताना समाजा-समाजात तेढ, अराजकता, अस्वास्थ्यता तयार करण्याचं काम त्यांनी केलं आहे. वनवासात रामाने कंद, मूळं खाऊन जीवन निर्वाह केला आहे. संन्यासी ऋषी महात्मा मांसाहारी नव्हते. हे तर डिवचणारं वक्तव्य असल्याचं विहिंपचे क्षेत्रीय महामंत्री गोविंद शेंडे यांनी स्पष्ट केलं आहे.
'सबका राम और सब में राम': विश्व हिंदू परिषदेने 'सबका राम और सब में राम' म्हटलं आहे. सर्वांच्या हृदयात राम आहे. ज्यात राम नाही तो निर्जीव झाला असल्याचंही शेंडे म्हणाले.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड : आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, मी कोणतंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही. कालच्या वक्त्याव्याबद्दल कोणाच्या भावना दुखावल्या असतील मी खेद व्यक्त करतो. मी कोणत्याही गुन्ह्याला घाबरत नाही. मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. त्याचं विकृतीकरण करणं माझं काम नाही. पण मी काल जे बोललो, ते ओघात बोलून गेलो. प्रभू श्रीराम ज्याला आम्ही महाराष्ट्रात पांडुरंग हरी म्हणतो. त्या रामाबद्दल बोलताना मी म्हणालो की, ते मांसाहारी होते. हा वाद मला आता वाढवायचा नाही. पण जे या विरोधात उभे राहिले आहेत, त्यांच्या माहितीसाठी मी सांगतो. वाल्मिकी रामायणात सहा स्कंद आहेत. त्यामध्ये यासंदर्भातील उल्लेख आहे. तो मी वाचून दाखवत नाही. कारण मला वाद वाढवायचा नाही, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय.
हेही वाचा: