ETV Bharat / state

बेताल वक्तव्य करणाऱ्या जावेद अख्तरांवर कारवाई करा; विश्व हिंदू परिषदेची मागणी - नागपूर शहर बातमी

येत्या काळात जावेद अख्तर विरुद्ध हिंदुत्ववादी संघटना, असा वाद पेटून विकोपाला जाण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध गीतकार, कवी आणि लेखक जावेद अख्तर यांनी काही दिवसांपूर्वी बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानसोबत करून नवा वाद ओढवून घेतला आहे.

v
v
author img

By

Published : Sep 6, 2021, 10:16 PM IST

नागपूर - येत्या काळात जावेद अख्तर विरुद्ध हिंदुत्ववादी संघटना, असा वाद पेटून विकोपाला जाण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध गीतकार, कवी आणि लेखक जावेद अख्तर यांनी काही दिवसांपूर्वी बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानसोबत करून नवा वाद ओढवून घेतला आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याच्या सोमवारी (दि. 6 सप्टेंबर) विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की जावेद अख्तर यांचे वक्तव्य अतिशय बेजबाबदार आणि पूर्वग्रह दूषित आहे. त्यांनी हिंदुत्ववादी संघटनांची तुलना तालिबान सोबत करून स्वतःच्या पद आणि प्रतिष्ठेचा गैरवापर केला आहे. त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई झाली पाहिजे, असेही ते म्हणाले आहेत.

बोलताना मिलिंद परांडे

जावेद अख्तर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे धार्मिक सोहार्द्र बिघडू शकते. तालीबानी म्हणजे इस्लामिक शासनाचा क्रूर चेहरा शरीया कायद्यावर चालणाऱ्या देशात प्रगती आणि स्थैर्याची अपेक्षा करणे चुकीचे ठरेल, असेही ते म्हणाले. आपण कुणासोबत राहायचे आणि कोणाशी संबंध जोडायची याचा विचार आता भारतीय मुस्लिमांनी करायला हवे, असा टोला पलांडे यांनी जावेद अख्तर यांना लागावला आहे. जावेद अख्तर यांचे वक्तव्य म्हणजे मूर्खपणाचे असून संपूर्ण मुस्लिम समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे असल्याचेही ते म्हणाले आहेत.

हिजाब प्रकरणी कारवाई व्हावी

4 सप्टेंबर रोजी हिजाब दिन आल्याचे सांगत काही मुस्लिम महिलांनी हिंदू तरुणींवर हिजाब घालण्यासाठी दबाव टाकला. ही घटना उघडकीस आल्यानंतर यावर विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की हिजाब डे च्या अनुषंगाने नागपुरात घडलेला प्रकार म्हणजे तालिबानी मानसिकतेचे प्रदर्शन आहे,ज्यांनी हे करू पाहिलं आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.

2023 च्या शेवटी रामलल्ला होणार विराजमान

अयोध्येत प्रभू रामाचे भव्य मंदिर तयार केला जात आहे. येत्या 2023 सालच्या शेवटी शेवटी राम लल्लाची प्राणप्रतिष्ठापना गर्भगृहात होईल, असा दावा मिलिंद परांडे यांनी केला आहे. मंदिराचे बांधकाम भव्य स्वरूपाचे असून येत्या तीन वर्षात ते माण काम पूर्ण होईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा - नागपुरात बैलपोळ्यानिमित्त भरला नंदीबैल बाजार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.