नागपूर - भाजपा नेत्या आणि खासदार मेनका गांधी यांनी उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील एका वेटरनरी डॉक्टरला कुत्र्याच्या उपचारावरून फोनवरून शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या घटनेचा वेटरनरी डॉक्टरांनी निषेध केला आहे. नागपूरच्या महाराष्ट्र पशुवैद्यकीय विज्ञान विद्यापीठाच्या डॉक्टरांनीही मेनका गांधींच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. बायकॉट मेनका गांधी असे नारे देण्यात आले.
निषेध म्हणून आज पाळला काळा दिवस
यावेळी नागपूरच्या महाराष्ट्र पशुवैद्यकीय विज्ञान विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या डॉक्टरांनी विद्यापीठाच्या गेटवर एकत्र येऊन या घटनेचा निषेध केला. तसेच फलक हातात घेऊन मेनका गांधी यांच्या विरोधात नारेबाजी केली. यावेळी मेनका गांधी यांनी पदवीधर पशुवैद्यकीय यांची माफी मागावी, अशी मागणीही केली. यासोबत या घटनेचा निषेध म्हणून आज काळा दिवस म्हणून पाळला आहे.
सोशल मीडियावर #boycottManekaGandhi मोहिम
मेनका गांधी यांच्यावर करवाई करावी, अशी मागणी इंडियन वेटरनरी एसोसिएशनने पत्र लिहून लोकसभेच्या अध्यक्षांकडे केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही तक्रार केली आहे. शिवाय, देशभर #boycottManekaGandhi, #मेनकागांधीमाफीमांगो अशा पद्धतीने सोशल मीडियावर मोहीम चालवली जात आहे.
हेही वाचा - तस्लीमा नसरीन यांचे इम्रान खान यांना जशाच तसे उत्तर; शर्टलेस फोटो केला टि्वट