ETV Bharat / state

कन्हान नदीच्या हरदास स्मशान घाटात दगडाने ठेचून अनोळखी व्यक्तीचा खून - स्मशानभूमीत खून

कामठीतील हरदास स्मशानभूमीत एका अनोळखी व्यक्तीचा म्रृतदेह आढळला आहे.

Nagpur murder
कन्हान नदीच्या तीरावरील हरदास स्मशान घाटात दगडाने ठेचून अनोळखी इसमाचा खून
author img

By

Published : Jun 5, 2020, 10:26 PM IST

नागपूर - जिल्ह्यातील नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील कन्हान नदीच्या तीरावर एक म्रृतदेह आढळला आहे. हरदास स्मशान घाटात एका अनोळखी व्यक्तीचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे.

कामठी विधानसभा क्षेत्राचे पहिले आमदार बाबू हरदास एल. एन यांच्या समाधी स्थळी हा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेह अर्धनग्न अवस्थेत असल्याने या खून प्रकरणात विविध तर्क वितर्क लावण्यात येत असून या खुनाचे रहस्य अजूनही कायम आहे.

घटनेची माहिती समजताच नवीन कामठीचे पोलीस निरीक्षक आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह हा अर्धनग्न अवस्थेत आढळला असून चेहरा हा पूर्णपणे विद्रुप झालेला असल्याने मृतकाची ओळख पटू शकलेली नाही. घटनास्थळी दगड, पाण्याची बॉटल,पर्स, कपडे आणखी काही साहित्य आढळून आले आहेत. त्याआधारे पोलीस मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.