नागपूर - रशिया युक्रेन युद्ध ( Russia Ukraine War Crisis ) सुरू आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये मोठ्या तणावाचे वातावरण आहे. येथील सर्व भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न भारत सरकारने प्रयत्न सुरू केल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याशी विषयावर बोलणे झाले आहे. सध्याच्या परिस्थितीत तिथे विमान उडवण्यावर बंदी घातली आहे. युद्ध सुरू असल्याने सध्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणता येणार नाही. त्यामुळे विमान उडवण्याची परवानगी मिळताच भारतीय नागरिक तसेच जे विद्यार्थी वैदकीय अभ्यासक्रमासाठी गेले आहे. त्याना परत भारतात आणता येईल. अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
'आर्थिकदृष्ट्या कमकुवतांना या योजनेचा लाभ'
गृह विभाग, हवाई वाहतूक आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रयत्न सुरू केले आहे. केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितिन गडकरी यांची पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री योजना आणि दिव्यांग सहायता योजना या दोन योजने संदर्भात माहिती दिली. बीपीएल व एपीएल वर्गातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या दिव्यांग व वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना योजनेचा लाभ दिला जाईल. यासाठी जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागापर्यंत ही योजना राबविण्यासाठी तलाठी ग्रामपंचायतचा सहाय्याने योजन पोहचून त्यांचे नाव नोंदणी करून घ्यावे. यासाठी प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे सुद्धा प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगत सगळ्यांनी कुठलाही पक्ष भेद न ठेवता सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन गरजूंना या योजनेत लाभ देण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
'50 प्रकारच्या उपकरणाचा मोफत लाभ'
दिव्यांगांसाठी व 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत सहायक साधने वाटपासाठी तपासणी शिबिरे घेतले जातील. या योजनेअंतर्गत व्हीलचेअर, तीनचाकी, वॉकिंग स्टिक्स, श्रवणयंत्र, चष्मे यासारख्या 50 प्रकारच्या उपकरणाचा मोफत लाभ दिला जाणार आहे. मध्यप्रदेशातील दिव्यांगांसाठी असलेले खास गार्डन नागपूर सुद्धा निर्माण करण्याचा मानस केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी बोलून दाखवला आहे.
हेही वाचा - War Affected Areas In Ukraine : युक्रेन रशिया युद्धाची भीषणता : पाहा VIDEO