ETV Bharat / state

Vajramuth Sabha : ही तर बाप चोरणारी अवलाद, भाजपच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची डरकाळी

आज नागपूरच्या दर्शन कॉलनीच्या मैदानावर महाविकास आघाडीची दुसरी सभा पार पडली असून महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. महत्त्वाचे म्हणजे अजीत पवार काय बोलतील याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, त्यांना बोलण्याची संधीच मिळाली नाही. परंतु अकोला विधानसभा क्षेत्राचे आमदार नितीन देशमुख यांनी मात्र, उपमुख्यमंत्री फडणवीसवर जोरदार प्रहार केला.

Vajramut Sabha
Vajramut Sabha
author img

By

Published : Apr 16, 2023, 10:57 PM IST

नागपूर : आज आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. आप्पासाहेबांचे व्यसनमुक्तीचे मोठे काम. पण सत्तेची नशा देश नासवते आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. आपल्या देशात लोकशाहीचा उपयोग फक्त सत्तेत बसलेल्यां मित्रांच्या फायद्यासाठी होतो आहे. यांच्या मित्राचा क्रम मात्र श्रीमंतीत वाढतोय आणि देशाचा सगळ्या बाबतीत खालवतोय. ह्या भूमीत बाबासाहेबांनी माणसाला ओळख निर्माण करून दिली. आता भारत मातेच्या पायात बेड्या घालण्याचे काम सुरू असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते आज नागपूरात महाविकास आघाडीच्या सभेत बोलत होते.

उलट्या पायाचे सरकार :आठ दहा दिवस अगोदर फडतुस शब्द निघाला पण त्यामागचा उद्देश काय होता. राज्यात उलट्या पायाचे सरकार आल्यावर अवकाळी, गारपीट सुरू आहे. आमचे डोळे वेळेत उघडले. आम्ही आधी काम करुन दाखवले मग सभा घेतो आहे. गद्दारी करुन सरकार पाडले ही महाराष्ट्राची परंपरा नाही. आम्ही वार झेलू तो छातीवर आणि करु तोपण छातीवर असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

राम मंदिरासाठी आमचाच आग्रह : मी अयोध्येला गेलो तेव्हा सुनील केदार पण सोबत होते. शिवसेनेने पहिले मंदिर फिर सरकार हा नारा दिला. आम्ही कायदा करा म्हणालो पण मोदींनी धाडस केले नाही. आता कोर्टाने निकाल दिल्यावर श्रेय घेत आहेत.

तर गुवाहाटीला न जाता अयोध्येत गेले असते : मुख्यमंत्री खरच राम भक्त असते तर सुरत गुवाहटी न जाता अयोध्येला गेले असते. फडणवीस कधी अयोध्येला गेले होते का? हे गेले म्हणून फडणवीस गेले. इकडे अवकाळी पण राम राज्य महाराष्ट्रात, देशात कधी येणार? शेतकरी रडतोय मग मागून मुख्यमंत्री जाऊन बोलतात. आम्ही वेळीच मदत केली होती.

मी टॉप पाच मुख्यमंत्रीमध्ये होतो : घरातबसून कारभार करत असूनही तुमच्या मदतीने केले आणि पहिल्या पाचात महाराष्ट्र होता. जनतेला काय हव ? नागपूरला एअर बस प्रकल्प मविआ विदर्भात आणणार होतो पण तो यांनी गुजरातला हलवला आणि हे आमच्यावर आरोप करतात.

८-९ वर्ष मोदींनी काय केले : बाप चोरणारी ही अवलाद न यांचे कुणी दैवत ना आदर्श. चंद्रकांत पाटील गेले होते का अयोध्येला? संघाला चंद्रकांत पाटलांचे म्हणणे पटतय का? शिवसेनाप्रमुखांचा अपमान तुम्ही करता. मी आव्हान देतो या मैदानात, मैदान मिळू नये म्हणून काड्या कसल्या करता. जनता जो निर्णय घेईल तो विनम्र पणे स्वीकारेल.

काँग्रेस मध्ये हिंदू नाहीत का : आमच हिंदुत्व शेंडी जानव्याचे नाही. यांचे हिंदुत्व हे गोमूत्रधारी आहे. संभाजीनगरच्या सभे नंतर यांनी गोमूत्र शिंपडले. तिथे आलेली लोक काय माणसे नव्हती? मोहन भागवत मशिदीत गेले मी गेलो असतो तर? हिंदुत्वाच्या भाकड कथा मला सांगू नका या देशासाठी त्याग करणारा हिंदू आहे.

असले हिंदुत्व आमचे नाही : २०१४ साली यांनी वचन मोडले. असले हिंदुत्व आमचे नाही. एका महिलेला जाऊन मारहाण केली मातृत्वासाठी उपचार करत होती तिच्या पोटात लाथा घातल्या. तिची तक्रार घ्यायला पोलीस तयार नाही. हे यांचे हिंदुत्व हे असे असेल तर मग गृहमंत्री फडतुस हा शब्द वापरला. फडतुस म्हणजे बिनकामाचा. देश मोकळा असायला हवा. क्रांतीकारक जे देशासाठी लढले होते. भाजपला सत्तेवर बसवण्यासाठी नाही तर जनतेसाठी लढले. अन्याय करणाऱ्यांना खुर्चीवर बसू देणार नाही हे तुम्हाला ठरवायचे आहे. हे नाहीतर कोणीही येईल पण ते नको.

सत्यपाल मलिक तर भाजपचे : हिडेनबर्ग चला फालतु असेल मग इतके का हादरलात? राहुल गांधीजींना अपात्र ठरवले. सत्यपाल मलिक तर भाजपचे त्यांनी केलेल्या गौफ्यस्फोट मानणार की नाही त्यांनी भयंकर गोष्टी सांगितल्या. वाजपेयजी म्हणायचे सरकारे येतील जातील पण देश असायला हवा. सगळे गद्दारांना घेऊन कारभार सुरु आहे ही सत्तेची नशा. गेल्या ८/९ वर्षात देशासाठी काय केले ते अगोदर सांगा.

हेही वाचा - Heat Problem Maharashtra Bhushan Program : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्णतेमुळे आरोग्य समस्या; 10 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.