नागपूर: नागपूरच्या सावनेर तालुक्यातील वाकी नदीत दोघांचा बुडाल्याने मृत्यू (Death by drowning in the river) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कुणाल गणेश लोहेकर (24) आणि नितेश राजकुमार साहू (27) असे मृतकांची नावे (Two youths drowned in Waki river) असून ते नागपरच्या जरीपटका भागातील स्नेहा दीप कॉलनीतील राहणारे आहेत. (Latest news from Nagpur), (Nagpur Crime)
खोल पाण्यात पोहण्याचा मोह नडला- स्नेहा दीप कॉलनीतील दहा ते बारा तरुण मुले वाकी येथे फिरायला गेले होते. यावेळी त्यांना पोहायचा मोह आवरता आला नाही. पोहताना दोन मुले खोल पाण्यात बुडाले. याची माहिती समजताच सावनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र अद्याप दोघांचाही मृतदेह हाती लागलेला नाही. त्यामुळे शोधकार्य सुरू आहे. या आसपासच्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.