नागपूर - जिल्ह्यातील पूर्व पेंच वन परिक्षेत्रात वाघाचा मृतदेह आढळून आला आहे. वाघाचे सर्व अवयव जागेवर असल्याने घातपाताची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांवर तरुणीने फेकला शाईचा फुगा
या प्रकरणी वाघाचा मृतदेह पूर्व पेंच वन परिक्षेत्रात कक्ष क्रमांक 536 येथील सलामा नाल्यात पडून होता. दोन ते तीन दिवसांपूर्वी वाघाचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज बांधण्यात येत आहे. मृत वाघाचे वय अंदाजे 2 वर्ष असून तो नर जातीचा आहे. दरम्यान, मृत वाघाच्या शरीरावर ठिकठिकाणी खोलवर जखमा आढळून आल्या आहेत. यामुळे हा वाघ इतर वन्य प्राण्यासोबत संघर्षात जखमी झाला असावा, अशी शक्यता आहे. दरम्यान, मृत वाघाचे सर्व अवयव (कातडी, मिशा, दात, नखे) जागेवर असल्याने शिकारीची शक्यता कमी असल्याची माहिती आहे.
हेही वाचा - 'खबरदार... पाकिस्तानचा कांदा आणलात तर आम्ही मार्केट जाळू'