ETV Bharat / state

Nitin Gadkari News : नितीन गडकरी खंडणी प्रकरण; खंडणीसाठी वापरलेले दोन सिमकार्ड जप्त

author img

By

Published : Mar 24, 2023, 2:55 PM IST

दोन महिन्यांपूर्वी 14 जानेवारीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना जीवे मारण्याच्या धमकीचे तीन फोन आले होते. त्या प्रकरणी नागपूर पोलिसांनी शोध मोहिम राबविली. आरोपीने खंडणीचा फोन करण्यासाठी वापरलेले दोन सिम कार्ड पोलिसांच्या हाती लागले आहेत.

Nitin Gadkari News
नितीन गडकरी खंडणी प्रकरण
प्रतिक्रिया देताना अमितेशकुमार पोलीस आयुक्त

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देऊन खंडणीची मागणी प्रकरणात नागपूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. नागपूर शहर पोलिस पथक तीन दिवसांपासून कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे तळ ठोकून आहेत. काल आणि आज नागपूर पोलिसांच्या पथकाने बेळगावच्या कारागृहात सर्च ऑपरेशन राबवले असता दोन सिम कार्ड पोलिसांच्या हाती लागले आहेत. हे सिम कार्ड वापरून मुख्य आरोपी जयेश कांथा उर्फ पुजारीने नितीन गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात खंडणीसाठी धमकीचे फोन केले होते.

जेलमध्ये अकस्मात सर्च ऑपरेशन : दहा कोटी रुपयांची खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या जयेश कांथा उर्फ पुजारीची चौकशीसाठी नागपूर पोलीस बेळगावात गेली. जेलमध्ये त्यांनी अकस्मात सर्च ऑपरेशन राबवले. यादरम्यान पोलिसांना दोन सिमकार्ड सापडले आहेत. हे तेच सिमकार्ड आहे, ज्याचा वापर जयेश कांथाने गडकरींच्या कार्यालयात खंडणीचा फोन करण्यासाठी वापर केला आहे. आरोपी जयेश कांथा उर्फ पुजारीची कस्टडी मिळवण्यासाठी देखील पोलिसांचा प्रयत्न आहे. याशिवाय पोलिसांनी बंगळुरू येथील तरुणीची चौकशी केली आहे. सध्या तिचा या कटात सहभाग नसल्याचे तपासात दिसत असल्याचे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. ज्या तरूणीचे नाव पुढे आले आहे, ती बंगलोरच्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.

बेळगाव, बंगळुरू कनेक्शन : मंगळवारी सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात खंडणी मागणारे धमकीचे तीन फोन आल्यानंतर नागपूर पोलीस ऍक्शन मोडवर आली आहे. खंडणी प्रकरणात आरोपीचा शोध घेतला. तेव्हा तपास पुन्हा बेळगावच्या तुरुंगापर्यंत जाऊन पोहचला आहे. त्याचबरोबर या केसमध्ये बंगलोर कनेक्शन आले समोर आले आहे. पोलीस त्या मुलीची चौकशी करत असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले आहे.

काय आहे प्रकरण : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील खामला येथे असलेल्या जनसंपर्क कार्यालयात मंगळवारी सकाळी सलग तीन धमकीचे फोन आले होते. जयेश कांथा उर्फ पुजारी नावावरून धमकीचे फोन कॉल आले आहेत. या वेळी आरोपीने १० कोटीची खंडणी मागितली. बंगलोर येथील एका तरुणीच्या मोबाईलवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे फोन कॉल करण्यात आले होते. ज्या मुलीच्या मोबाईलवरून फोन आले तिने फोन केला नसला, तरी त्या तरुणीचा एक मित्र जयेश कांथा उर्फ पुजारी कारागृहात कैद असल्याची माहिती समोर आली आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू झाला आहे.

कोण आहे जयेश कांथा उर्फ पुजारी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नागपूर शहरातील बजाज नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात जयेश कांथा नामक एका कुख्यात गुंडाचा सहभाग आढळून आला आहे. तो बेळगाव कारागृहात कैद आहे. 2016 मध्ये आरोपीला खुनाच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा झालेली आहे. आरोपी फाशीची शिक्षा भोगत असल्याने कायदेशीर प्रक्रिया करून त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

ऑफिस, निवासस्थानाच्या सुरक्षेत वाढ : जयेश कांथावर कारागृहातुन पळून जाण्याचा गुन्हा दाखल आहे. खंडणी मगितल्याचा जुना रेकॉर्ड आहे. पहिल्यांदा त्याने नितीन गडकरी यांना खंडणी मागण्यांसाठी धमकीचा फोन केला होता. त्यावेळी नागपूर पोलिसांनी त्याची चौकशी केली, तेव्हा त्याच्याकडे एक डायरी सापडली होती, त्यात अनेक व्हीआयपी लोकांचे नंबर असल्याचे तपासात पुढे आले आहे. धमकीचे तीन फोन आल्यानंतर नितीन गडकरी यांचे नागपूरातील निवासस्थान व जनसंपर्क कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा : Nitin Gadkari Threat Case : नितीन गडकरी धमकी प्रकरण; नागपूर पोलिसांचे पथक बेळगावात, बंगळुरुमधील तरूणीबाबत महत्वाची माहिती समोर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.