नागपूर - शहर पोलीस विभागातील गुन्हे शाखेच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने दोन तरुणांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ५३.४८ ग्राम एमडी ड्रग्स पावडर जप्त केल आहे. सौरभ छपाने आणि संदीप पांडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. सौरभ हा एका कंपनीत कामाला असून तो ड्रग्स सप्लाय करण्याचे काम करत असल्याची माहिती आहे.
आरोपीकडून ५३.४७ ग्राम एमडी ड्रग्स पावडर जप्त -
सौरभ छपाने आणि संदीप पांडे हे दोघे वैद्यनाथ चौक येथे एमडी ड्रग्ज घेवून येणार असल्याची माहिती अंमलीपदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे या पथकाने सापळा रचून आरोपी सौरभ दादाराव छपाने आणि संदिप मुचकुंद पांडे या दोघांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता ५३.४७ ग्राम एमडी ड्रग्स पावडर आढळून आले. या ड्रग्सची किंमत 5 लाख ३४ हजार ८०० रुपये इतकी आहे. याशिवाय आरोपींच्या जवळ असलेली मोटारसायकल आणि मोबाईलसुद्धा पोलिसांनी जप्त केले आहे.
मुख्य सुत्रधाराचा शोध सुरू -
एमडी ड्रग्स तस्करीच्या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार अंकिश उर्फ गुलाम संजय तुर्केल हा असून तो फरार आहे. तसे अंकिश तुर्केल याच्याविरुद्ध खुन तसेच खुनाचा प्रयत्न, असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखेच्या अमलीपदार्थ विरोधी पथक गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या मागावर आहे.
हेही वाचा- 'आम्हाला कोणी मराठी प्रेमाचे ज्ञानामृत पाजण्याची गरज नाही'