ETV Bharat / state

Nagpur Crime: एकाच रात्री खुनाच्या दोन घटना, नागपूर शहर हादरले!

author img

By

Published : Apr 5, 2023, 10:54 AM IST

नागपुरात एकाच रात्री खुनाच्या दोन घटनांनी शहर हादरले आहे. शहरात एकाच रात्री खुनाच्या दोन वेगवेगळ्या घटनांनी खळबळ उडाली आहे. यशोधरा नगर आणि पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे खून झाले आहेत. वैयक्तिक वादातून खुनाच्या या घटना झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

nagpur crime
खुनाच्या दोन घटनांनी नागपूर शहर हादरले

नागपूर: गेल्यावर्षी नागपूर शहरात दर महिन्यात सरासरी हत्येच्या ५ ते ६ घटनांची नोंद आहे. तसेच गेल्या काही महिन्यांपासून नागपूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यात नागपूर पोलिसांना यश आले होते. मात्र, एकाच रात्री दोन खुनाच्या घटना घडल्यामुळे पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. खुनाची पहिली घटना ही पाचपावली परिसरात घडली आहे.

दोन ठिकाणी खुनाची घटना: नागपूरच्या पाचपावली परिसरातील राणी दुर्गावतीनगर चौकात रात्री साडेअकराच्या सुमारास झाली. 25 वर्षीय उमेश नंदेश्वर असे पाचपावलीतील खून झालेल्या मृताचे नाव आहे. जुन्या भांडणातून खून झाल्याची माहिती आहे, याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. खुनाची दुसरी घटना ही यशोधानगर येथील विनोबा भावेनगर परिसरात येथे घडली आहे. या घटनेत धिरज चुटेलकर या तरुणाचा याचा खून झाला आहे. त्याचा मित्र राजेश मन्ने गंभीर जखमी झाला आहे. दोघांवरही चाकूने वार करून जखमी केले होते. त्यांचा मृतदेह मेयो रुग्णालयात दाखल केला असता, मृतकांच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तर खुनातील आरोपींचा शोध सुरू आहे.

गेल्या वर्षी ७६ हत्याची नोंद: दरवर्षी नागपूर शहरात सरासरी शंभर खूनाच्या घटना घडत होत्या. गेल्या वर्षी हा आकडा बराच कमी झाला आहे. गेल्यावर्षी नागपूर शहरात दर महिन्यात सरासरी हत्येच्या ५ ते ६ घटनांची नोंद आहे. मागीलवर्षी शहरात ७६ खुनाच्या घटना घडल्या होत्या. यावर्षी १९ खुनाच्या घटना घडल्या आहे. यामध्ये जानेवारी महिन्यात ८ हत्येच्या घटना घडल्या होत्या तर फेब्रुवारी महिन्यात शहरात ५ खून झाले आहे. मार्च महिन्यात सुद्धा ४ खुनाच्या घटनेची नोंद आहे. याशिवाय एप्रिल महिन्यात आज एकाच रात्री दोन खुनाच्या घटना घडल्यामुळे शंभर दिवसात १९ खून झाले आहेत.

पोलिसांच्या धकड कारवाईमुळे गुन्हे घटले?: गेल्या दोन वर्षाच्या काळात नागपूर पोलिसांनी गुन्हेगारांची धरपकड करून त्यांच्यावर मकोका आणि प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत शेकडो गुन्हेगारांवर कारवाई केली. मोठ्या प्रमाणात गुंडांना तडीपार देखील केले होते. तर अनेक मोठे गुंड सध्या कारागृहात कैद असल्याने त्यांच्या टोळ्या आता सक्रिय नाहीत. त्यामुळे एकूणच गुन्हेगारी घटना कमी झाल्या असल्याचा निष्कर्ष काढला जाऊ शकतो.

हेही वाचा: Nagpura Suicide case 24 तासामध्ये दोन आत्महत्या फेसबुक लाईव्ह करत तरुणाची तर जवानाची क्वार्टरमध्ये आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.