नागपूर- शनिवार आणि रविवारी नागपुरात जनता कर्फ्यू लावण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. नागरिक जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद देत आहेत. नागरिकांनी असाच प्रतिसाद दिला तर नागपूरमध्ये लाॅकडाऊन लावण्याची वेळ येणार नसल्याचे पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले. जनता कर्फ्यूचा दौरा आटोपल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
जनतेने जनता कर्फ्यूला मनावर घेतल्याचे चित्र आहे. जनता कर्फ्यू दरम्यान शहरातील सर्व दुकाने, प्रतिष्ठने बंद आहेत. नागरिकांनी सुद्धा जनता कर्फ्यूला जोरदार प्रतिसाद दिलेला आहे. नागरिकांनी अशा प्रकारे नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. नागरिकांनी चांगली साथ दिली तर लॉकडाऊन आणि कर्फ्यू करण्याची गरजच भासणार नसल्याचे मुंढे म्हणाले आहेत.