ETV Bharat / state

नागपुरात २४ तासात ९८ रुग्णांचा मृत्यू तर ७ हजार २२९ नवीन रुग्णांची भर - नागपूर कोरोना रुग्ण

मागील २४ तासात नागपूर शहरात आणि जिल्ह्यात तब्बल ७ हजार २२९ रुग्णांना कोरोनाची लागण झालेली आहे. यामध्ये ४ हजार ७८७ रुग्ण शहरातील आहेत तर २ हजार ४३४ रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. उर्वरित ८ रुग्ण हे बाहेरील आहेत. आज (बुधवारी) ६ हजार ३६४ रुग्णांची भर पडल्यामुळे एकूण सक्रिय रुग्णाची संख्या ७१ हजार ५५७ इतकी झाली आहे.

नागपूर कोरोना
नागपूर कोरोना
author img

By

Published : Apr 21, 2021, 7:54 PM IST

नागपूर - उपराजधानी नागपुरसह संपूर्ण विदर्भात कोरोना बधित मृत्यूंचे आकडे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. गेल्या २४ तासात उपराजधानी नागपूर शहरात आणि जिल्ह्यात तब्बल ९८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मृत्यूचे आकडे हे शंभरीच्या जवळच स्थिरावत असल्याने चिंता वाढली आहे.

मागील २४ तासात नागपूर शहरात आणि जिल्ह्यात तब्बल ७ हजार २२९ रुग्णांना कोरोनाची लागण झालेली आहे. यामध्ये ४ हजार ७८७ रुग्ण शहरातील आहेत तर २ हजार ४३४ रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. उर्वरित ८ रुग्ण हे बाहेरील आहेत. आज (बुधवारी) ६ हजार ३६४ रुग्णांची भर पडल्यामुळे एकूण सक्रिय रुग्णाची संख्या ७१ हजार ५५७ इतकी झाली आहे. आज (बुधवारी) जिल्ह्यात २४ हजार १६३ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. ज्यामध्ये १५ हजार ३५६ आरटीपीसीआर आणि ८ हजार ८०७ अँटीजन चाचण्यांचा समावेश आहे. नागपूर शहरात आणि जिल्ह्यात तब्बल ९८ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ५२ रुग्ण शहरी भागातील तर ३८ रुग्ण नागपूरच्या १४ तालुक्यातील आहेत. नागपूर मध्ये एकूण मृतकांचा आकडा ६ हजार ५७५ इतका झाला आहे.

कुणी बेड देता का बेड

कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या नागपूर जिल्ह्यात परिस्थिती अतिशय भीषण झालेली आहे. शासकीय आणि खासगी रुग्णालयात बेड मिळणे देखील अशक्य झाले आहेत. त्यामुळे शेकडो रुग्ण शासकीय मेयो आणि मेडिकल रुग्णालयांच्या बाहेर उपचारासाठी ताटकळत असल्याचे भयाण वास्तव आहे. मात्र आरोग्य व्यवस्थाच अपुरी पडत असल्याने यंत्रणेचा नाईलाज झालेला आहेत. अशात रोज वाढणारी रुग्ण संख्या धोकादायक ठरत आहे. शेकडो रुग्णांना बेड मिळवण्यासाठी अनेक खासगी रुग्णलयांमध्ये फेऱ्या माराव्या लागत आहेत. मात्र तरी देखील त्यांच्या पदरी निराशाच पडत असल्याने कुणी बेड देता का बेड असेच म्हणायची वेळ रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांवर ओढवली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.