ETV Bharat / state

राज्याच्या उपराजधानीत १२ तासांत तिघांचा खून - नागपूर गुन्हे वार्ता

नागपुरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या तब्बल ३ घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागपूर शहर हदरले आहे. या तीनही प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

three-murder-in-12-hours-in-nagpur
राज्याच्या उपराजधानीत १२ तासांत तिघांचा खून
author img

By

Published : Jan 9, 2021, 9:02 PM IST

नागपूर - राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या तब्बल ३ घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागपूर शहर हदरले आहे. एअर गण चालवण्याचा सराव करताना चुकून छर्रा लागल्याने युवकाचा मृत्यू झाला. तर, दुसऱ्या घटनेत आठ आरोपींनी संगनमत करून एका अल्पवयीन मुलाचा खून केला आहे. तिसरी घटना कामठी शहरातील बस स्थानकाच्या चौकात घडली. या ठिकाणी कुंदन वंजारी नामक व्यक्तीचा खून झाला आहे. तीनही प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांची प्रतिक्रिया

डोळ्याला चुकून छर्ऱा लागल्याने मृत्यू -

पहिली घटना ही शहरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाभा परिसरात घडली आहे. आपल्या मित्राला एअर गनचे प्रात्यक्षिक दाखवताना दुसऱ्या मित्राच्या डोळ्याला चुकून छर्ऱा लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. लोकेश गजभिये असे मृतकाचे नाव आहे. तर पोलिसांनी लोकेशच्या मृत्यू प्रकरणी त्याचे मित्र पंकज विलासराव वाणी यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, जखमी लोकेश यांना उपचाराकरीता मेयो हॉस्पीटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. याप्रकरणी आरोपीविरूध्द कलम ३०४ भादंवि अन्वये गुन्हा नोंदवून आरोपी पंकज वाणी यांना अटक केली आहे.

डीजेमध्ये नाचण्याच्या वादातून खून -

कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डिप्टी सिग्नल परिसरात आठ आरोपींनी संगनमत करून १५ वर्षीय विनय डहारे नामक तरुणाचा खून केला आहे. विनय आणि आरोपी हे चांगले मित्र होते. काही दिवसांपूर्वी डीजेमध्ये नाचताना त्यांच्यात वाद झाला होता. त्या वादाचा वचपा काढण्यासाठी आरोपी शेखर शाहु, योगेश बंजारे (२०) अविनाष गिरी (२२) सुनील पटेल (२०) गनिया बोरकर (१८) मनिष पटेल (१ ९), तुषार यादव (१८), आणि बनितेष यादव (१८) यांनी विनय राजेश डहारे याला शनि मंदिर विद्यापीठ आश्रमच्या बाजूला बोलावून मारहाण केली. त्यानंतर या आरोपींनी जुन्या भांडणाचे कारणावरून विनयवर चाकूने वार केले. ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी कळमना पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आठ पैकी काही आरोपींना अटक केलेली आहे.

क्षुल्लक कारणावरून खून -

कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मृतक कुंदन रंगारी (४०) हा अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करतो. दोन दिवसांपूर्वी मृतकाच्या घरी आरोपी करण वानखेडे आणि तंट्या नामक आरोपी दारू पिण्यासाठी गेले असता मृतकाने दोघांनानी पळवून लावले होते. याचा राग मनात धरून आज दोन्ही आरोपींनी बस स्थानक चौकात कुंदनवर चाकूने हल्ला केला. ज्यामध्ये कुंदन गंभीर जखमी झाला होता. स्थानिकांच्या लक्षात ही घटना येताच त्यांनी कुंदनला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, पोलिसांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती समजताच कामठी पोलिसांनी गुन्हा नोंद करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

हेही वाचा - निकष पूर्ण करणारे नसतील, तर त्यांचे परवाने रद्द करू - नवाब मलिक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.