ETV Bharat / state

Cash Theft Case : भाजी व्यावसायिकाच्या घरातून ६० लाखांची रोकड लंपास, नोकरच निघाला चोरीचा सूत्रधार - cash stolen from Apartment

आठ दिवसांपूर्वी नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हनी कार्तीक अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका भाजी व्यावसायिकाच्या घरातून 60 लाख रुपयांची रोकड लंपास (cash stolen from Apartment) केल्याची घटना उघडली आली होती. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली (Three accused arrested in theft case) (Nagpur Crime) (latest news from Nagpur)

Cash Theft Case
Cash Theft Case
author img

By

Published : Oct 26, 2022, 4:08 PM IST

नागपूर: आठ दिवसांपूर्वी नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हनी कार्तीक अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका भाजी व्यावसायिकाच्या घरातून 60 लाख रुपयांची रोकड लंपास (cash stolen from Apartment) केल्याची घटना उघडली आली होती. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली (Three accused arrested in theft case) असून त्यांच्याकडून चोरीचे 27 लाख रुपयांची रोकड जप्त (27 lakh seized in Nagpur) करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आरोपी हा फिर्यादीच्या दुकानात कामाला आहे. अटक आरोपींमध्ये मिथिलेश माखनसिंग मानकुर, भूपेश रमेश डोंगरे, आशिष उर्फ डेम्बो भीमराव भैसारे या तीन चोरट्यांचा समावेश आहेत. (Nagpur Crime) (latest news from Nagpur)

घटनाक्रम असा घडला: 20 ऑक्टोबरच्या दुपारी निपाने यांच्या फ्लॅट मध्ये चोरीची घटना घडली होती.फिर्यादी उमेश बळीराम निपाने आणि त्यांचा लहान भाऊ पंकज निपाने यांचे कळमना मार्केटमध्ये दुकान आहे. दोघेही भाऊ दुकानात गेले असताना तीन चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून 60 लाख रुपयांची रोकड लंपास केली होती. उमेश यांच्या घरी काम करणारी रत्ना निनावे जेव्हा त्यांच्या घरी स्वयंपाक करण्यासाठी आल्या तेव्हा. दरवाजा उघडण्यासाठी चावी लावली असता दरवाजा लाॅक नव्हता तसेच लोटून ठेवलेला होता. निनावे यांना आतमध्ये पाहिले असता देवघरातील कपाट उघडे होते. आतील सामान सर्वत्र पसरलेले दिसले. त्यावरून घरात चोरी झाल्याची शंका आल्याने निनावे यांनी दुकानात फोन करून दोघांनाही बोलावून घेतले होते. दोघा भावांनी घर गाठून पाहिले असता देवघरातील आलमारी उघडी असून लाॅकर तुटलेले दिसले. त्यात ठेवलेले माल खरेदी विक्रीचे ५५ लाख ५० हजार रूपये आणि इतर मौल्यवान साहित्य चोरट्यांनी लंपास केल्याचं उघड झाले. त्यावरून कळमना पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती.

पोलिसांची तात्पुरता,आरोपी अटकेत : चोरीच्या घटनेची तक्रार दाखल झाल्यानंतर कळमना पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. चोरीच्या प्रकरणात जवळच्या व्यक्ती सहभागी असावा असे संकेत मिळत असल्याने सर्वप्रथम दुकानात काम करणाऱ्यांवर संशय आल्याने त्यांची सखोल विचारपूस सुरू केली. दुकानात काम करणारा मिथिलेश माखनसिंग ठाकुर याच्यावरील संशय बळावला. त्याची चौकशी सुरू केली तेव्हा त्याने गुन्हा कबूल केल्यानंतर भूपेश रमेश डोंगरे व आशिष उर्फ डेम्बो भीमराव भैसारे या आरोपींना अटक केली. पोलिसांनी तीनही चोरट्यांकडून चोरीला गेलेली 27 लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.