ETV Bharat / state

RSS Third Year Class Training: 'आरएसएस'च्या तृतीय वर्ष वर्ग प्रशिक्षण शिबिराला आजपासून सुरुवात - RSS Third Year Class Training

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ('आरएसएस') तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचा आजपासून (सोमवार) नागपुरात शुभारंभ झाला आहे. पुढील २५ दिवस हा वर्ग प्रशिक्षण वर्ग चालणार आहे. यात देशभरातील ६८२ स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.

RSS Third Year Class Training
आरएसएस
author img

By

Published : May 8, 2023, 4:18 PM IST

नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी अतिशय महत्त्वाचे असलेले तृतीय वर्ष संघ शिक्षा प्रशिक्षण शिबीर आजपासून सुरू झाले. नागपूरच्या रेशीमबाग येथील डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसरात असलेल्या महर्षी व्यास सभागृहात प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली. उद्‌घाटन प्रसंगी संघाचे सहसरकार्यवाह तसेच वर्गाचे पालक अधिकारी रामदत्त, शिबिराचे सर्वाधिकारी कृष्णमोहन यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

संघ स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होणार: लवकरच संघ स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षा वर्गात सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांनी येत्या दिवसांमध्ये कार्य विस्तासंदर्भात आपली भूमिका काय असावी, याबाबत विचार करायला हवा. संघ आणि समाजाचे विचार एकरूप होईस्तोवर आपल्याला कार्यरत राहावे लागणार आहे, असे प्रतिपादन सहसरकार्यवाह रामदत्त यांनी यावेळी केले.

६८२ स्वयंसेवक सहभागी: यंदाच्या शिबिरात देशभरातून २० ते ४० या वयोगटातील ६८२ स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. २१ मे ला प्रशिक्षणार्थींचे पथसंचालन होणार आहे. तर १ जून रोजी वर्गाचा समारोप होणार आहे.

'आरएसएस' आणि बजरंग दलाचा संबंध काय? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रमाणेच बजरंग दल हा देखील हिंदुत्वाच्या मुद्द्यावरचं कामं करत आहे. आरएसएस प्रमाणेचं बजरंग दलाचा स्वतःचा इतिहास आहे. दोन्ही संघटना एकाचं विषयावर काम करत असली तरी दोन्ही संघटनेची रचना, कार्यशैली खूप वेगळी आहे. कर्नाटकच्या निवडणूक प्रचारात हिंदत्ववादी बजरंग दलाची तुलना सिमी, पीएफआय या सारख्या दहशतवादी संघटनांशीही केली जात आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,विश्व हिंदू परिषद, बजरंग दलातील नातं : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशातील सर्वात मोठी हिंदुत्ववादी सामाजिक, कौटुंबिक संघटना आहे असं म्हंटल जातं. २७ सप्टेंबर १९२५ यावर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केशव बळीराम हेडगेवार यांनी केली होती. संघ हा ९८ वर्षांचा झाला आहे. देशातील सर्वात मोठे संघटन म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसचा उल्लेख होतो. संघाने १९६४ या वर्षी विश्व हिंदू परिषदेची स्थापना केली. तर १९८४ मध्ये विश्व हिंदू परिषदेने बजरंग दल नावाने तरुणांची नवीन एक संघटना जन्माला घातली. संघात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्र सेविका समिती दोन मदर ऑर्गनायझेशन आहेत. १९६४ साली गुरुजी गोवळकर सरसंघचालकपदी असताना त्यांनी विश्व हिंदू परिषदेची नॉन पॉलिटिकल ग्लोबल ऑर्गनायझेशन म्हणून स्थापन केली. विश्व हिंदू परिषद ही संघ स्वयंसेवी निर्मित आणि संचालित संस्था आहे. बजरंग दल हे विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांचं अपत्य आहे. त्याच प्रमाणे विश्व हिंदू परिषद हे देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांचे अपत्य आहे हे या तिघांमध्ये असलेलं नातं आहे.

हेही वाचा: Shirdi Beautification Plan : शिर्डी शहराचं रूप आता पालटणार! शहराच्या सौंदर्यकरणासाठी शासनाकडून 52 कोटींचा निधी मंजूर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.