ETV Bharat / state

Nagpur News : नागपुरात फिल्मी स्टाईलने चोरी, राजनांदगावातून पैसे आणि कार जप्त, वाचा संपूर्ण घटना - नागपूर पोलिसांनी केली कारवाई

70 लाख रुपये आणि नागपुरात चोरीला गेलेले वाहन पोलिसांनी राजनांदगाव येथून जप्त केले आहे. आरोपींनी फिल्मी स्टाईलने चोरीची घटना घडवून घरात खड्डा खोदून पैसे लपवले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या वडिलांना 22 मे रोजी अटक केली.

Nagpur News
नागपुरात फिल्मी स्टाईलने चोरी
author img

By

Published : May 26, 2023, 11:29 AM IST

70 लाख रुपये आणि नागपुरात चोरीला गेलेले वाहन पोलिसांनी राजनांदगाव येथून जप्त केले आहे.

राजनांदगाव : महाराष्ट्रातील नागपुरात 70 लाखांची चोरी झाली होती, याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला राजनांदगाव येथून अटक केली आहे. आरोपी नरेश महिलंगे असे त्या आरोपीचे नाव असून नागपुरातील करमटारा वस्ती परिसरात चोरी केली होती. त्यानंतर त्याने कार चोरुन त्यात पाचशे रुपयांचे बंडलाचे दोन पोते भरले. हा सगळा चोरीचा माल घेऊन तो राजनांदगावला आला. उदयपूर येथील त्याच्या घरी जाऊन त्याने नोटांचे बंडल घरातील जमिनीत गाडले. चोरीची कार राजनांदगाव येथील परिसरात सोडून दिली. चोरीची ही घटना 22 मे पूर्वी घडली होती.

22 मे रोजी नागपूर पोलिसांनी केली कारवाई : चोरी उघडकीस आल्यानंतर नागपूर पोलिसांनी तपास सुरू केला असून चौकशीत आरोपी नरेश महिलंगे हा राजनांदगाव येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा माग काढत पोलीस राजनांदगावातील उदयपूर येथे पोहोचले. त्याच्या घरावर छापा टाकला असता त्याचे कुटुंबीय सापडले. आरोपी सापडले नाहीत. वडिलांकडे चौकशी केली असता त्यांनी दोन पोती चोरीच्या नोटा असल्याची माहिती दिली. पोलिसांनी घरातील खड्डा खोदून चोरीची रक्कम जप्त केली. नागपूर पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीचे वडील अंकलहू महिलंगे याला अटक केली. चोरीचे पैसेही पोलिसांनी जप्त केले आहेत. आरोपी नरेश महिलंगे याने चोरीची घटना फिल्मी स्टाईलने केली. महाराष्ट्रात झालेल्या चोरीच्या घटनेत चोरट्याने सुमारे 70 लाख 50 हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. यासोबतच घराजवळ उभी असलेली कारही आरोपीने फोडली आणि त्याच कारमध्ये त्याने पैसे घेऊन उदयपूर गाव गाठले.

फिल्मी पद्धतीने घडली घटना : आरोपी नरेश महिलंगे याने संपूर्ण घटना फिल्मी पद्धतीने घडवली. त्यानंतर रोकड घेऊन बाय रोड नागपूर येथून चोरीच्या कारमध्ये राजनांदगाव गाठले. आरोपी स्वत: कार चालवत राजनांदगाव येथे आला. यादरम्यान याबाबत कोणालाच सुगावा लागला नाही. मात्र सततच्या तपासानंतर पोलीस जेव्हा आरोपी नरेश महिलंगेच्या ठिकाणी पोहोचले तेव्हा त्याचे सर्व गुपित उघड झाले. संपूर्ण घटना घडल्यानंतर आरोपींनी चोरीची कार राजनांदगाव येथील पॉश परिसरात सोडून दिली. जी कोतवाली पोलिसांनी बेवारस स्थितीत जप्त केली आहे. कोतवाली पोलिसांनी बेवारस कारमधून दोन लाख रुपये आणि मोबाइल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 70 लाखांची रोकड जप्त केली आहे.

हेही वाचा : 1. President On Tribal Women : आदिवासी महिला असल्याचा अभिमान आहे - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

2. Osho Property Dispute: ओशोंच्या मालमत्ता वाद प्रकरणात पुणे धर्मादाय कार्यालयावर मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे

3. New Parliament Inauguration : राष्ट्रपतींच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन व्हावे; सर्वोच्च न्यायालयात याचिका, आज होणार सुनावणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.