ETV Bharat / state

नागपूरमध्ये कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा भयानक - नागपूर कोरोना दुसरी लाट 4824 मृत्यू

नागपूरमध्ये कोरोनाची पहिल्या लाटेत गंभीर परिस्थिती होती. मात्र, दुसरी लाटही पहिल्या लाटेपेक्षा भयंकर ठरली. दुसऱ्या लाटेत कोरोना मृत, रुग्णांचा आकडाही पहिल्या लाटेच्या दुप्पट झाला. नागपूरमध्ये 28 फेब्रुवारीपर्यंत कोरोना बाधितांची संख्या 1 लाख 49 हजार 788 इतकी होती. 18 जूनपर्यंत 4 लाख 76 हजार 606 कोरोना बाधितांची नोंद झाली. तर दुसऱ्या लाटेत 4824 मृत्यू झाले.

nagpur
nagpur
author img

By

Published : Jun 19, 2021, 3:58 PM IST

नागपूर - नागपूर जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आणि कोरोनाच्या पहिल्या लाटेत दररोज मृत्यूने शंभरी गाठलेले शहर म्हणून पाहायला मिळाले. एकाच दिवसात 112 जण हे कोरोनाने मृत्यू झालाले नागपूरकरांनी पाहिले आहेत. दिवस-रात्र पेटलेले स्मशान पाहिले. दरम्यानच्या काळात एप्रिल महिन्यात उपराजधानीवर मृत्यूचे तांडव पाहायला मिळाले. तेच मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून परिस्थिती सुधारताना दिसली. 18 जूनला आलेल्या अहवालात मृत्यूची संख्या शून्य होती. पण असे असले तरी फेब्रुवारीनंतरच्या साडेचार महिन्यात 4 हजार 824 मृत्यू झाले आहेत.

नागपूरमध्येच शून्य मृत्यूची नोंद म्हणजे दिलासा

नागपूर शहराची लोकसंख्या जवळपास 25 लाखाच्या घरात, तर जिल्ह्याची लोकसंख्या 46 लाखाच्या घरात आहे. यात पहिल्या लाटेत ग्रामीण भाग असो की शहरी, कोरोनाची भिती आणि निर्बंध अधिक कडक राहिले. दुसऱ्या लाटेची तीव्रता पाहता पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिकच. यात पहिल्या लाटेनंतर 7 फेब्रुवारीला 1 लाख 49 हजार 788 जण हे बाधित आढळले. त्यात मृत्यूची संख्या त्या दिवशी शून्य राहिली. ज्या शहराने एका दिवसात 112 मृत्यू पाहिले. तिथे शून्य मृत्यूची नोंद हे दिलासादायकच म्हणावे लागले.

पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत दुप्पट रुग्ण

नागपूर जिल्ह्यात पहिल्या लाटेत 28 फेब्रुवारीपर्यंत कोरोना बाधितांची संख्या 1 लाख 49 हजार 788 इतकी होती. तेच 7 फेब्रुवारीला बाधितांची संख्या 1 लाख 36 हजार 98 इतकी होती. फेब्रुवारी महिन्यात 13690 जणांना कोरोनाची लागण झाली होती. मार्च महिन्यात 2 लाख 29 हजार 668 संख्या झाली. हाच आकडा 30 एप्रिलपर्यंत 4 लाख 7 हजार 787 पर्यंत पोहोचला. एप्रिल महिन्यात सर्वाधिक 1 लाख 78 हजार 119 जण बाधित झाले. म्हणजे एप्रिलमध्ये पहिल्या लाटेतील बाधितांचा उच्चांक मोडीत निघाला. तेच मे महिन्याच्या अखेरीस 4 लाख 74 हजार 605 रुग्णसंख्या झाली. 66 हजार 818 जण बाधित झाले. तर 18 जूनपर्यंत 4 लाख 76 हजार 606 कोरोना बाधितांची नोंद झाली. या 18 दिवसात केवळ 2001 जण बाधित झाले. जी संख्या सर्वाधिक कमी आहे. 7 फेब्रुवारीनंतर साडेचार महिन्याच्या कालावधीत 3 लाख 26 हजार 818 बाधित झाले. जी रुग्णसंख्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुपट्टीपेक्षा अधिक आहे.

दुसऱ्या लाटेत 4824 मृत्यू

नागपूर जिल्ह्यात 7 फेब्रुवारीपर्यंत 4192 कोरोना मृत्यूची नोंद होती. या दिवशी शून्य मृत्यूची नोंद होती. 28 फेब्रुवारीला 4335पर्यंत मृत्यूचा आकडा पोहोचला. या 21 दिवसात 143 जण दगावले. मार्च महिन्यात 763 जण कोरोनाने दगावले. एप्रिल महिन्यात सर्वाधिक 2290 जण कोरोनाने दगावले. मे महिन्यात 1514 जण दगावल्याची नोंद आहे. यात 18 जूनपर्यंत 9016 जण दगावले. 7 फेब्रुवारीनंतर 131 दिवसात 4824 जण दगावले.

आरोग्य व्यवस्थेत राज्यात अव्वल

नागपूर शहर आणि जिल्ह्याची लोकसंख्या ४.६ दशलक्ष आहे. त्यामुळे सध्या नागपूर जिल्ह्यात प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे 3616 बेड्‌स उपलब्ध आहेत. यामध्ये प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे 2162 ऑक्सिजन बेड्‌स, 610 आयसीयू बेड तर 217 आयसीयू व्हेंटिलेटर बेडची आवश्यकता आहे. ही संख्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी दिली. कोरोनाच्या पहिल्या लाटेत 2020मध्ये फक्त 66 खासगी रुग्णालये होते. ही संख्या मार्च अखेरपर्यंत 88 झाली. यानंतर रुग्णालये वाढवण्यात आली. एप्रिलमध्ये 108 पर्यंत रुग्णालये सुरू झाली. एप्रिल अखेरपर्यंत 146 कोविड रुग्णलाये सुरू झाली.

हेही वाचा - महाराष्ट्रातील 'हा' अतिदुर्गम तालुका झाला कोरोनामुक्त; अत्यंत तोडक्या सुविधांमध्येही आरोग्य विभागाची कामगिरी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.