ETV Bharat / state

Tekdi Flyover Will Demolished : प्रसिध्द टेकडी उड्डाणपूल उद्यापासून पाडणार, १५ दिवसात होणार जमीनदोस्त

author img

By

Published : Jul 18, 2023, 4:38 PM IST

बहुप्रतिक्षित टेकडी उड्डाणपूल पाडण्याचे कार्य महामेट्रो उद्या पासून हाती घेतआहे. उड्डाण पुलाखालील दुकाने रिकामे करुन स्थलांतरित करण्यात आली आहेत. पूल पाडण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतली जात असून विशिष्ट ठिकाणी डायव्हर्शन बोर्ड आणि बॅरिकेड्स महा मेट्रोच्या वतीने लावण्यात आले आहेत. (Tekdi Flyover Will Demolished)

The famous Tekdi flyover
प्रसिध्द टेकडी उड्डाणपूल

नागपूर : शहरातील प्रसिध्द टेकडी उड्डाणपूल पाडण्याच्या कामास बुधवार पासून सुरवात होत आहे. 812 मीटर लांब आणि 10.5 मीटर रुंद असलेला हा उड्डाणपूल 2008 मध्ये 16.23 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला होता. उड्डाणपुलाखाली एकूण १७५ दुकाने बांधण्यात आली होती, परंतु जयस्तंभ चौक परिसरातील वाहतूकीची रोज उद्भवणारी कोंडी लक्षात घेता व वाहतुक समस्या सोडवण्यासाठी जयस्तंभ चौकाच्या आजूबाजूच्या रस्त्याच्या परिसरात बदल करण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यानुसार लोहा पुलाजवळ रेल्वे-अंडर-ब्रिज तर किंग्जवे येथे वाय शेप उड्डाणपूल प्रस्तावित आहे. येथिल उड्डाणपूल पाडून तेथे पुन्हा रस्ता तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

व्हीएनआयटीच्या अहवालानुसार: या कामाचा अहवाल 2018 मध्ये सादर करण्यात आला आणि त्यानंतर संपूर्ण काम महा मेट्रोला डिपॉझिट वर्क तत्त्वावर देण्यात आले. त्यानुसार किंग्जवे फ्लायओव्हर आणि आरयूबी बांधण्यात आले. रेल्वे स्थानकासमोरील सध्याचा उड्डाणपूल पाडून जयस्तंभ आणि मानस चौकला जोडणारा रस्ता सिमेंट काँक्रीटचा तयार करणे आवश्यक आहे त्यामुळे तो पाडण्यात येत आहे.

महामेट्रोने बांधली १११ दुकाने : उड्डाणपूलखाली काम करणाऱ्या दुकानदारांना सामावून घेण्यासाठी महामेट्रोने १११ दुकाने बांधली आणि ती दुकाने त्यांना वाटपासाठी महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. दुकानदारांनी कायदेशीर हस्तक्षेपाची मागणी केली होती. ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यास विलंब झाला मात्र, उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या दुकानदारांनी आता तयारी दाखवल्या नंतर महापालिकेने उड्डाणपूल पाडण्याची तयारी दर्शवली.

१५ दिवसांत पूल जमीनदोस्त करणार : मेट्रोचे प्रकल्प (संचालक) राजीव त्यागी यांनी सांगितले कि, एनसीसी ( NCC) द्वारे मेसर्स मॅटच्या माध्यमातून उड्डाणपूल पाडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. वर्धा रोडवरील छत्रपती चौक येथील उड्डाणपूल पाडला ती मेसर्स मॅट एजंसी. टेकडी उड्डाणपूल पाडण्याची प्रक्रिया १५ दिवसांत पूर्ण करणार आहे. हवामानाच्या परिस्थितीनुसार यामध्ये थोडा बदल होऊ शकतो.

असा आहे ट्रॅफिक प्लॅन : एलआयसी किंवा आरबीआय चौककडे सेंट्रल एव्हेन्यू कडून येणारी आणि जाणारी वाहतूक, पूर्वी प्रमाणेच राहणार आहे. एलआयसी किंवा आरबीआय चौककडून सेंट्रल एव्हेन्यू किंवा रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या वाहतूकी मध्येही कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. उड्डाणपुलावरून जयस्तंभ चौक आणि मानस चौक या भागात जाणारी वाहतूक मात्र बंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

  1. Nitin Gadkari Threat Case: नितीन गडकरी धमकी प्रकरणात चौकशी दरम्यान अफसर पाशाच्या छातीत दुखू लागले, उपचार सुरू
  2. Nitin Gadkari Threat Case: नितीन गडकरी धमकी प्रकरण; दहशतवादी अफसर पाशाचे नागपूर कनेक्शन उघड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.