नागपूर - शहरामध्ये महाराष्ट्र उर्दू साहित्य अकॅडमी व अल्पसंख्याक विकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्या विद्यमाने ५ दिवसीय उर्दू नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. उर्दू भाषेतील साहित्य समोर यावे; उर्दू भाषेची जडणघडण व्हावी, याच संकल्पनेतून या नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा महोत्सव नागपूर शहरातील शंकर नगर येथील साई सभागृहात संपन्न होत आहे. या महोत्सवात सहभागी झालेले कलावंत हे मुंबई, भिवंडी, सोलापूर, मालेगाव अशा अनेक शहरातून आले आहेत. या उर्दू नाट्य महोत्सवात एकूण ३० नाटके सादर करण्यात येणार आहेत.