ETV Bharat / state

Terrorist Afsar Pasha : गडकरींना खंडणीची धमकी देणाऱ्या दहशतवाद्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खंडणीची धमकी देणारा दहशतवादी अफसर पाशाची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. 15 जुलै रोजी नागपूर पोलिसांनी अफसर पाशाला बेळगाव कारागृहातून अटक केली होती. अटकेनंतर, अफसर पाशाची एकूण १० दिवस पोलीस कोठडीत कसून चौकशी करण्यात आली.

author img

By

Published : Jul 27, 2023, 7:04 PM IST

Terrorist Afsar Pasha
Terrorist Afsar Pasha
अफसर पाशाची न्यायलयीन कोठडीत रवानगी

नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देऊन 100 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणाचा सूत्रधार बशरुद्दीन नूर मोहम्मद उर्फ अफसर पाशाची रवानगी न्यायलयीन कोठडीत करण्यात आली आहे. आज पोलीस कोठडी संपल्यानंतर पाशाला न्यायालयात हजर करण्यात आले होते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अफसर पाशाला न्यायालयीन कोठडी सुनावली.

एनआयएच्या अर्जावर हायकोर्टात सुनावणी बाकी : मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधातील धमकी आणि खंडणी प्रकरणाच्या चौकशीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने गेल्या आठवड्यात नागपुरातील विशेष न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावला. नागपुरातील विशेष न्यायालयाने एनआयएला दोन्ही प्रकरणे नागपूरहून मुंबईला हस्तांतरित करायची असल्यास उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी धंतोली ठाण्यात नोंदवलेल्या दोन्ही गुन्ह्यांवर नागपूर न्यायालयाचे स्थानिक अधिकार असल्याचे निरीक्षणही विशेष न्यायालयाने नोंदवले होते. त्यानुसार एनआयने आता उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे अर्ज केला असून, त्यावर अद्याप सुनावणी झाली नाही.

पोलिसांनी दिले होते ना हरकत प्रमाणपत्र : नितीन गडकरी यांच्या धमकी आणि खंडणी प्रकरणात दहशतवादी कनेक्शन उघडकीस आल्याने नागपूर पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासात सुलभता आणण्यास परवानगी दिल्याची माहिती नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. न्यायालयाने परवानगी दिल्यास पुढील काही दिवसांत तपास एनआयएकडे सोपविला जाईल, असेही अमितेश कुमार म्हणाले.

अफसर पाशाचे नागपूर कनेक्शन : नागपूर पोलिसांकडून अफसर पाशाची चौकशी सुरू करण्यात आली असून त्याने धक्कादायक खुलासे करण्यास सुरवात केली आहे. अफसर पाशाचे नागपूर कनेक्शन देखील चौकशी दरम्यान उघड झाले आहे. तो २००३-२००४ मध्ये तो नागपुरात वास्तव्याला होता. चौकशी दरम्यान तो वारंवार उत्तरे बदलत असल्याची माहिती पुढे आली आहे. एनआयएचे पथक देखील त्याची चकाशी करणार असल्याची शक्यता असून १९ जुलैपर्यंत अफसर पाशाला पोलीस कोठडी मिळाली आहे.

अफसर पाशावर बॉम्बस्फोटाचे आरोप : मास्टर माइंड कुख्यात दहशतवादी बशीरुद्दीन नूर अहमदला उर्फ अफसर पाशा हा लष्कर-ए-तैयबाचा कुख्यात दहशतवादी असून तो 2014 पासून बेळगाव कारागृहात कैद होता. त्याने जयेश पुजारी उर्फ शाकीर याचे ब्रेनवॉश करून त्याचा बेळगाव कारागृहातील दहशतवादी नेटवर्कसाठी वापर केला होता. अफसर पाशा 2003 च्या ढाका आणि 2005 च्या बंगळुरू बॉम्बस्फोटांचा आरोपी आहे. अफसर पाशाने जयेशला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात फोन करून खंडणीची मागणी केली होती.

हेही वाचा - Gadkari Extortion Case : गडकरींना खंडणी मागणारा दहशतवादी अफसर पाशाच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.