ETV Bharat / state

विदर्भात उष्णतेची लाट; सर्वच जिल्ह्यांचे तापमान ४० अंशांच्या वर

विदर्भातील सर्वच शहरांचे तापमान चाळीशीच्या पार गेले आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. एकीकडे कोरोनाचे संकट आणि दुसरीकडे उन्हाचे चटके अशा दुहेरी संकटाचा सामना नागरिकांना करावा लागतो आहे.

विदर्भात उष्णतेची लाट
विदर्भात उष्णतेची लाट
author img

By

Published : Mar 30, 2021, 4:42 PM IST

नागपूर - एप्रिल महिना सुरू होण्यापूर्वीच विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पार गेले आहे. केवळ विदर्भातच नाही तर संपूर्ण राज्यात तापमानाचा पारा चढला आहे. नागपूरसह विदर्भात अक्षरशः सूर्य तळपायला सुरुवात झाल्याने रस्त्यांवरील वर्दळ कमी झाली आहे. अचानक तापमान वाढल्याने नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे.

विदर्भात सूर्य तळपायला सुरुवात झाली आहे. विदर्भातील सर्वच शहरांचे तापमान चाळीशीच्या पार गेले आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. एकीकडे कोरोनाचे संकट आणि दुसरीकडे उन्हाचे चटके अशा दुहेरी संकटाचा सामना नागरिकांना करावा लागतो आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीचे तापमान तर ४३.३ डिग्री नोंदविण्यात आले आहे. विदर्भातील उन्हाळा नेहमीच असह्य असतो. यंदा मार्च महिन्यातच पारा ४० अंशाच्या पुढे गेलामुळे एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा आणखीन वाढणार हे आता स्पष्ट झाले आहे.

माहिती देतांना अधिकारी

राजस्थानकडून उष्ण वारे
विदर्भात अचानक तापमान वाढण्यामागे राजस्थानकडून येणारे उष्ण वारे कारणीभूत असल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक मोहनलाल शाहू यांनी दिली आहे. पुढील तीन दिवस अशीच परिस्थिती कायम राहणार असून तापमानात आणखीन वाढ होण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा-लॉकडाऊनच्या मुद्द्याला राजकीय रंग, विरोधकांसह सत्तापक्षातील नेत्यांचाही विरोध

हेही वाचा-बाजारपेठेत खरेदीला जाणा-या ग्राहकांवर टोल, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनोखी शक्कल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.