ETV Bharat / state

डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचाऱ्यांना तातडीने PPE किट पुरवण्याचे 'सर्वोच्च' निर्देश

कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांना तातडीने PPE (personal protective equipmemt) उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार व सर्व राज्य सरकारांना दिले आहेत.

डॉ. जेरील बानाईत ( याचिकाकर्ते)
डॉ. जेरील बानाईत ( याचिकाकर्ते)
author img

By

Published : Apr 9, 2020, 8:20 AM IST

नागपूर - कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांना तातडीने PPE (personal protective equipmemt) उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार व सर्व राज्य सरकारांना दिले आहेत.

डॉ. जेरील बानाईत ( याचिकाकर्ते)

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे, अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या पहिल्या फळीतील वैद्यकीय सेवकांनादेखील कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. वैद्यकीय सेवकांना हा संसर्ग होऊ नये, म्हणून या सेवकांना ppe किट अवश्यक असते, परंतु देशात या स्वरक्षण साहित्याचा तुटवडा असल्याची माहिती समोर आली. यानंतर नागपूरचे डॉक्टर जेरील बानाईत यांनी सर्वोच्च न्यायालयात 1 एप्रिलला जनहित याचिका दाखल केली. यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार व राज्य सरकारांना नोटीस जारी करीत एक आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. या प्रकरणी सुनावणी करीत वैद्यकीय सेवकांना तातडीने ppe किट उपलब्ध करून देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायलायने दिले.

सोबतच हे वैयक्तिक सुरक्षा संच अधिक प्रमाणात तयार करण्यासाठी सरकारने कार्यवाही करावी आणि प्रसंगी या साहित्याची निर्यात थांबवावी. याशिवाय कोरोना विषयावर कार्य करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांशी कोणी गैरव्यवहार करीत असेल तर, अशा लोकांवर कडक कारवाईचे निर्देश देत सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका निकाली काढली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.