नागपूर - महामेट्रोकडून प्रवाश्यांच्या सोयीकरीता नवनवीन उपक्रम राबवले जातात. रविवार विशेष म्हणून नागपूर महामेट्रोकडून प्रवाश्यांसाठीा खास व्यवस्था करण्यात आली आहे. सीताबर्डी एक्स्चेंजवर 12 ते 3 वाजेच्या दरम्यान बँड वादन आणि 4 ते 6 दरम्यान गाण्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सोबतीला खव्येगिरी आणि शॉपिंगचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
गाणे- खाण्यासंह विविध स्टॉलचे आयोजन
नागपूरात महामेट्रोकडून प्रवाश्यांसाठी सतत नवनवीन उपक्रम राबवले जातात. यात सेलिब्रेशन ऑन व्हील्, फिडर अशा विविध उपक्रमांचा सामावेश असतो. यंदाही नागपूर महामेट्रोकडून प्रवाश्यांसाठी खास मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. सीताबर्डी इंटरचेंज स्टेशन येथे दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलातर्फे बँड वादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच संध्याकाळी ४ ते ६ दरम्यान नागपूरच्या नावाजलेल्या सचिन आणि सुरभी ढोमणे यांच्या सूर संगम संस्थेतर्फे गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एवढेच नाही तर खव्य्यांसाठी विविध रुचकर पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले आहे.
जास्तीत जास्त नागपूरकरांनी लाभ घ्यावा-
सोबतच शॉपिंगची आवड असणाऱ्यांसाठीसुद्धा इथे खास आयोजन करण्यात आले आहे. ज्यात आयुर्वेदिकपासून पर्यावरणपूरक वस्तू विक्रीला आहेत. महामेट्रोच्या या कार्यक्रमांना नागपूरकरांकडून मोठ्या प्रमाणात दाद मिळते. तर रविवारी कार्यक्रमांचे आयोजन केल्यामुळे उपस्थितांची संख्या अधिक असते. तरी जास्तीत जास्त नागपूरकरांनी या सोईंचा लाभ घ्यावा असे आवाहन महामेट्रोतर्फे करण्यात आले आहे.