ETV Bharat / state

प्रजनन वाढीसाठी नागपूरचा 'सुलतान' मुंबईला रवाना

गोरेवाडा रेस्क्यु सेंटरमधील सुलतान (सी-1) वाघाला बोरीवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रवाना करण्यात आले आहे. सुलतानचा उपयोग वाघांच्या प्रजनन वाढीसाठी केला जाणार आहे.

sultan tiger will be shifted to Mumbai
नागपूरचा 'सुलतान' मुंबईला रवाना
author img

By

Published : Dec 25, 2019, 8:42 PM IST

नागपुर- गोरेवाडा रेस्क्यु सेंटरमधील सुलतान (सी-1) वाघाला बोरीवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रवाना करण्यात आले आहे. सुलतानचा उपयोग वाघांच्या प्रजनन वाढीसाठी केला जाणार आहे.

सुलतान वाघ नागपूर गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये जुलै 2018 मध्ये मुक्कामाला आला होता. त्याने चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी परिसरात २ नागरिकांचा बळी घेतल्यानंतर त्याला बंदीस्त करुन गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये आणण्यात आले होते. बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिजली आणि मस्तानी या वाघिणी जोडीदाराच्या प्रतीक्षेत आहेत. सुल्तानला गुणसूत्र गुणधर्म (प्रजोत्पादन) बदलाकरिता रवाना करण्यात आले आहे. त्यामुळे उद्यान प्रशासनाने नागपूरमधील गोरेवाड्यातील 'राजकुमार' या वाघाची मागणी केली होती. मात्र गोरेवाडा प्रशासनाने राजकुमारऐवजी सुल्तान वाघाला पाठविण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर सुलतान बोरिवलीला पाठवण्यात आले.

प्रजनन वाढीसाठई नागपूरचा 'सुलतान' मुंबईला रवाना

वन परिसरातील वाघाच्या मदतीनं प्रजनन प्रक्रिया पार पाडल्यास त्याचा चांगला परिणाम होतो. गुणसूत्र बदलासाठी गोरेवाडा येथील सुलतान या वाघाला बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाठविण्यात आले आहे. सुलतान या वाघाचा बोरिवली येथे व्याघ्र प्रजननासाठी उपयोग केला जाणार आहे. सुलतानला घेऊन जाताना वनविभागाने कमालीची गुप्तता पाळण्याचा प्रयत्न केला. छायाचित्र किंवा व्हिडिओ घेण्यासाठी मज्जाव करण्यात आला होता.

Intro:नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यु सेंटरमधील सुल्तान ( सी-1 ) वाघाला बोरीवलीमधील संजय गांधी  राष्ट्रीय उद्यानात रवाना करण्यात आलं आहे...सुल्तान वाघाला घेवून  बोरीवलीहून आलेली विशेष टीम रवाना झाली आहे...सुलतानचा उपयोग वाघांच्या प्रजनन वाढी साठी केला जाणार आहे Body:सुल्तान वाघ नागपूर गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये  जुलै 2018 मध्ये मुक्कामाला आला होता, त्यानं चंद्रपूर जिल्ह्यातील  ब्रम्हपूरी परिसरात दोन नागरिकांचा बळी घेतल्यानंतर त्याला बंदीस्त करून गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये आणण्यात आलं होतं. बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिजली आणि मस्तानी या वाघिणी जोडीदाराच्या प्रतीक्षेत आहे.... गुणसूत्र गुणधर्म (प्रजोत्पादन) बदलाकरिता रवाना करण्यात आलं आहे....त्यामुळं उद्यानं प्रशासनानं नागपूर मधील गोरेवाड्यातील "राजकुमार"  या वाघाची मागणी केली होती, मात्र गोरेवाडा प्रशासनानं राजकुमारऐवजी सुल्तान वाघाला पाठविण्याची तयारी दर्शवली. त्यांनंतर काल सुलतान बोरिवली ला रवाना झाला..प्राणी संग्रालयातील वाघ आणि वाघीण यांचात संबंध येतो.आणि त्यातून जे शावक जन्माला येते ते शारीरिक दृष्ट्या कमजोर असण्याची शक्यता असते.त्यामुळे वन परिसरातील वाघाच्या मदतीनं प्रजनन प्रक्रिया पार पाडल्या स त्याचा चांगला परिणाम होतो. गुणसूत्र बदलासाठी गोरेवाडा येथील सुलतान या वाघाला बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाठविण्यात आले आहे.सुलतान या वाघाचा बोरिवली येथे व्याघ्र प्रजननासाठी उपयोग केला जाणार आहे....सुलतान घेऊन जातात वनविभागाने कमालीची गुप्तता पाळण्याचा प्रयत्न केला,कुणाला छायाचित्र किव्हा व्हिडिओ घेण्यासाठी मज्जाव करण्यात आला होता Conclusion:null

For All Latest Updates

TAGGED:

sultan tiger
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.