ETV Bharat / state

Sudhir Mungantiwar : बुंद से गयी वो हौद से नही आती; शरद पवार यांच्या दौऱ्यावर मुनगंटीवारांची टीका - Sudhir Mungantiwar Reaction

अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली. गेल्या आठवड्यात पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी नाशिकच्या येवला मतदारसंघात आज जाहीर सभा घेतली आहे. तर शरद पवार यांच्या नाशिक दौऱ्यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी टिका केली आहे.

Sudhir Mungantiwar On Sharad Pawar
शरद पवार आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
author img

By

Published : Jul 8, 2023, 10:05 PM IST

माहिती देताना सुधीर मुनगंटीवार

नागपूर : बुंद से गयी वो हौद से नही आती, अशा शब्दांत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवार यांच्या नाशिक दौऱ्यावर टीका केली आहे. शरद पवार यांनी तेव्हा भाकरी फिरवली असती तर ही वेळ आली नसती, असे देखील ते म्हणाले. २०१४ पासून 'काही पे निगाहे काही पे निशाणा' असे न करता भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जे ठरले होते ते शरद पवार यांनी तेव्हा केले असते तर, कार्यकर्ते व सहकाऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास बसला असता, असे देखील सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

प्रेमाने लोकप्रतिनिधी टिकवावे लागतात : तुमच्या स्वभावामध्ये आपले लोकप्रतिनिधी हे टिकवण्याची शक्ती राहिलेली नाही, आचरणाने, प्रेमाने आपले लोकप्रतिनिधी टिकवावे लागतात. परंतु तुमच्या पक्षात ज्या घटना घडल्या आहेत, त्याला भारतीय जनता पार्टीला कशाला दोष देता. असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

बीज बोये बबूल के तो बेर कहाँ से आये : ज्यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला, ज्यांनी राजीव गांधी यांचा अवमान केला. नरसिंह राव प्रधानमंत्री होत असताना राजकीय चक्रव्युह रचले त्यांनी आम्हाला सांगू नये. 'बीज बोये बबूल के तो बेर कहाँ से आये' तुम्ही आता संघटना बांधणी करू शकत नाही. कारण लोकांच्या लक्षात आले की, देश हिताशी तुम्हाला काही देणे घेणे नाही. केवळ तुम्हाला मोदी यांचा विरोध करायचा आहे असा आरोप, मुनगंटीवार यांनी केला आहे. शरद पवार हे कृषी मंत्री होते त्यावेळी, देशात ७० हजार शेतकरांच्या आत्महत्या झाल्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यामागे काय कारण होते? आता कितीही दौरे केले तरी फायदा होणार नाही. ते दौरे फुसकेच ठरतील असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. अजूनही काही लोक अजित पवार यांच्या संपर्कात आहेत, तेही दादांसोबत येतील असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

लवकर खाते वाटप होईल, औपचारिक बाकी : नवीन मंत्र्यांचा शपथविधी नुकताच झाला आहे. लवकर खाते वाटप होईल. आमची खाती काढून त्यांना द्यायची आहेत. मंत्रिमंडळाचा पुन्हा एक विस्तार होणार आहे, म्हणून कदाचित खाते वाटपात वेळ होत असेल असे ते म्हणाले.

यात अनिल पाटील यांचा दोष नाही : नव्याने मंत्री झालेले अनिल पाटील यांच्या स्वागतासाठी लहान शाळकरी मुलांना उन्हात उभे करण्यात आले होते. यावरून जोरदार टीका होत असताना सुधीर मुनगंटीवार यांनी तर अनिल पाटील यांचा यात काहीही दोष नाही असे म्हटले आहे. अनेकदा उत्साहाच्या भरात काही कार्यकर्ते, कर्मचारी व अधिकारी हे काम करतात. त्यामध्ये अनिल पाटील यांचा दोष नाही. कोणीतरी उत्साहाच्या भरात नजरेत यावे म्हणून अशा कार्यक्रमाचे आयोजन करतात.

उध्दव ठाकरेंना त्यांच्या शिक्षकांनी सांगितले नसेल : विदर्भाचा दौरा करणे ही उध्दव ठाकरे यांची मजबुरी आहे ते काय करतील. पहिला करोनामध्ये दौरा केला असता, तर कदाचित एकनाथ शिंदे हे आमच्याबरोबर आले नसते. तेव्हा त्यांनी काहीच केले नाही, घरी बसले म्हणून आता दौरे करावे लागत आहेत. कधी ना कधी कष्ट करावे लागतात. आधी अभ्यास करा नंतर जीवन सुखाचे, आधी अभ्यास केला नाही तर नंतर जीवन कष्टाचे हे साधारण सूत्र असते. हे आमच्या शिक्षकांनी सांगितले होते कदाचित त्यांच्या शिक्षकांनी सांगितले नसेल.

बच्चू कडू नाराज नाहीत : बच्चू कडू कुठे मी नाराज आहे म्हणाले नाहीत. मी इथेही नाराज आहे आणि परत महाविकास आघाडीमध्ये जातो असे ते कधीही म्हणाले नाहीत. कुणीही मोठा नेता नाराज झाला तर तो वाटोळं करतो असा त्यांच्या बोलण्याचा आशय होता. पण ते नाराज नाहीत. तसेच पंकजा मुंडे या राजकारणातून दोन महिने सुट्टी घेणार असल्याचे म्हणत आहे, त्या मध्यप्रदेशला जाणार नाही असे त्यांचे म्हणणे नाही. त्यांनी सुट्टी घेतली आहे.

ठाकरे गटाचे आमदार अपात्र होतील : उध्दव ठाकरे आणि शिंदे गटातील आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी नोटीस बजावली आहे. कोणत्या कारणांमुळे अपात्रतेची नोटीस दिली. आता अपात्रची नोटीस देणे फॅशन झाले आहे. काही कायदे आहे निकष आहेत. ४० आमदार कसे अपात्र होतील, तुम्हीच अपात्र व्हाल. तुमच्याकडे पक्ष नाही. तुमची अवस्था शोले चित्रपटातल्या त्या जेलर सारखी आहे, आधे उधर आधे इधर तुम अकेले घूमते रहे हो.

हेही वाचा -

  1. Mungantiwar On Tiger Attack Chandrapur : चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात वर्षभरात पन्नास व्यक्तींचा बळी- वनमंत्री मुनगंटीवार
  2. Maharashtra Political Crisis : दौऱ्याची सुरुवात करण्यास नाशिकच का निवडले, शरद पवारांनी पत्रकार परिषदेत केला खुलासा
  3. NCP Political Crisis: शरद पवारांच्या सभेला छगन भुजबळ रॅलीने देणार उत्तर, नाशिकमध्ये शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.