नागपूर - शैक्षणिक शुल्क वाढीसंदर्भात जवाहरलाल नेहरू विद्यपीठात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे विद्यार्थी देखील रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनात विविध विद्यार्थी संघटनांनी आपला सहभाग नोंदवला.
हेही वाचा - मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या उच्च समितीची जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी घेतली भेट
फी वाढ तसेच संपूर्ण देशात सुरू असलेले शिक्षणाचे खासगीकरण थांबवण्याची मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली. त्यासोबतच, मानव संसाधन मंत्रालयाने १०% नीधी विद्यार्थ्यांसाठी खर्च करावा आणि शिष्यवृत्ती नियमित सुरू करावी, या मागण्यादेखील विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.