नागपूर - श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून भारताने आज 'चांद्रयान-2'चे प्रक्षेपण केले. चांद्रयान-2 चे प्रक्षेपण म्हणजे भारतासाठी गर्वाचा क्षण होता. भारताच्या या यशाला शब्दात मोजता येणार नसल्याची भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
'चांद्रयान-2' सुमारे 3 लाख 84 हजार किमीचा प्रवास केल्यानंतर येत्या ६ सप्टेंबरला चंद्रावर उतरणार आहे. तोपर्यंत सर्वकाही सुरळीत पार पडावे, अशी आशा देखील विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे या माध्यमातून चंद्रावरील अनेक रहस्य उलगडणार आहेत. त्याचा नक्कीच भारताला फायदा होईल, असे देखील विद्यार्थी म्हणाले. एवढेच नाहीतर आतापर्यंत नासा सर्व संशोधन करण्यात पुढारलेला आहे. मात्र, नासापेक्षा आमचा भारत देखील पुढे चालल्या असल्याच्या भावना विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केल्या.