नागपूर - अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य सरकारने ६ हजार ६०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यापैकी २ हजार १०० कोटी रूपये वितरीत करण्यात आले असल्याची माहिती अर्थमंत्री जयंत पाटील यांनी दिली. नुकसानग्रस्त शेतकरी आणि पूरग्रस्तांच्या मदतीकरता राज्य सरकारने १४ हजार ६०० कोटी रुपयांची केंद्र सरकारकडे मागणी केल्याचेही पाटील म्हणाले.
आज राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. त्या शेतकऱ्या मदतीची गरज आहे. अशातच राज्य सरकारने त्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारला विनंती करुन १४ हजार ६०० कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती जयंत पाटील यांनी विधानसभेत दिली.