ETV Bharat / state

राज्य सरकार वीजग्राहकांमध्ये दहशत निर्माण करत आहे - विदर्भ राज्य आघाडी - vidarbha rajya aghadi agitation in nagpur

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने संविधान चौकात वीजबिलासंदर्भात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकार वीजमाफी देण्याऐवजी वीज कापण्याच्या धमक्या देत आहे, असा आरोप विदर्भ राज्य आघाडीचे नेते राम नेवले यांनी केला.

state government is creating panic among power consumers said vidarbha rajya aghadi
राज्य सरकार वीजग्राहकांमध्ये दहशत निर्माण करत आहे - विदर्भ राज्य आघाडी
author img

By

Published : Feb 16, 2021, 3:12 AM IST

नागपूर - राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारने जनतेला वीजमाफी देण्याऐवजी वीज कापण्याच्या धमक्या देत आहे, असा आरोप विदर्भ राज्य आघाडीचे नेते राम नेवले यांनी केला. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने यासंदर्भात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. संविधान चौकात हे आंदोलन करण्यात आले.

प्रतिक्रिया

वीजबिल माफ करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले होते आश्वासन -

वीज मंडळाचे कर्मचारी पोलिसांना सोबत घेऊन ग्राहकांकडे वीजकनेक्शन कापत आहे. हे सरकार अतिरेकीपणाचे काम करत आहे, असे म्हणत राम नेवाले यांनी निषेध नोंदवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 300 युनिटपर्यंत वीजबिल माफ करू, असे आश्वासन दिले होते. तसेच ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनीही 100 युनिट माफ करू, असे म्हटले होते. यासाठी 1850 कोटींचा प्रस्ताव देण्यात आला होता. परंतु आज जबरदस्तीने कनेक्शन कापण्याचे काम केले जात आहे, असेही नेवाले म्हणाले. तसेच सरकारने वीजकनेक्शन कापल्यास आम्ही जोडून देऊ, असेही ते म्हणाले.

विदर्भाला 200 युनिट माफ करा -

विदर्भात 70 टक्के वीज तयार होते. त्यासाठी पाणी, जमीन, कोळसा ही संपत्ती विदर्भाची आहे. तसेच प्रदूषणाचे दुष्परिणामही विदर्भाची जनता सोसत आहे. त्यामुळे किमान 200 युनिट विदर्भाच्या जनतेला मोफत द्यावे, अशी मागणीही विदर्भ राज्य आघाडीच्यावतीने करण्यात आली.

हेही वाचा - चंद्रकांत दादा हा कसला पुरुषार्थ ? शरद पवारांवर केलेल्या टीकेवर जयंत पाटलांचा घणाघात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.