नागपूर - राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस विभागाने विनापरवाना मद्यसेवा पुरवणाऱ्या हॉटेल्स आणि ढाब्यावर छापा टाकला. यावेळी २ हॉटेल मालक आणि १९ मद्यपींवर कारवाई करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून १४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नागपूर शहर सावजी मांसाहारासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे शहरात आणि शहरालगत देखील सावजीचे हॉटेल्स आहेत. मात्र, काही ठिकाणी दारूसेवा पुरवली जात असल्याचे समोर आले. हॉटेल चालवणारे दारू सेवा पुरवत असल्याच्या अनेक तक्रारी देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी अजनी आणि हुडकेश्वर परिसरात कारवाई केली. पराते सावजी आणि देशी चुला या हॉटेल्सवर पोलीस विभागाच्या मदतीने कारवाई करण्यात आली. यामध्ये २ हॉटेल मालक आणि ९ मद्यपींचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्यावर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे नोंदवले आहेत. गेल्या महिन्यात देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाने अशाच प्रकारची कारवाई केली होती.
हे वाचलं का? - दारू दुकानाचे परवाने रद्द करण्यासाठी महिला जिल्हास्तरीय कार्यालयात, अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ