नागपूर- जिल्ह्यातील नागपूर शहरातील कोरोनाचे सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा भागात अखेर एसआरपीएफची तुकडी तैनात करण्यात आली आहे. प्रसासनने मंगळवारी या भागातील 1,200 नागरिकांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केले आहे.
हेही वाचा- पश्चिम बंगालमध्ये 'रेड झोन' परिसरात जमावाचा पोलिसांवर हल्ला
या भागातील आमदार कृष्णा खोपडे आणि स्थानिक नगरसेवकांनी या भागात सैन्य किंवा एसआरपीएफचे सैन्य तैनात करण्याची मागणी केली होती. सतरंजीपुरा परिसर नागपुरातील कोरोना हॉटस्पॉट असून सतरंजीपुरा आणि आजूबाजूच्या परिसरातील 80 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सतरंजीपुरा परिसरात एसआरपीएफ म्हणजेच राज्य राखीव पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. तिथल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून एसआरपीएफला पोलिसांच्या मदतीसाठी तैनात करण्यात आले आहे.