ETV Bharat / state

पाक सीमेवर धुमश्चक्री: नागपूर जिल्ह्यातील काटोलच्या भूषण यांना वीरमरण

गुरेज सेक्टर श्रीनगर येथे पाकिस्ताने केलेल्या भ्याड हल्ल्यात नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात राहणारे भूषण सतई हे हुतात्मा झाले आहेत. ते केवळ २८ वर्षांचे होते. ही दुःखद बातमी समजताच संपूर्ण काटोलसह नागपूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

नागपूर
नागपूर
author img

By

Published : Nov 14, 2020, 7:51 AM IST

Updated : Nov 14, 2020, 8:08 AM IST

नागपूर - ऐन दिवाळीच्या पूर्व संध्येला नागपूर जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गुरेज सेक्टर श्रीनगर येथे पाकिस्ताने केलेल्या भ्याड हल्ल्यात नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात राहणारे भूषण सतई हे हुतात्मा झाले. ही दुःखद बातमी समजताच संपूर्ण काटोलसह नागपूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावताना भूषण यांना वीरमरण आले. ते केवळ २८ वर्षांचे होते.

आज होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भूषण सवई अगदी वयाच्या वीसाव्या वर्षी भारतीय सैन्यात सहभागी झाले होते. महाविद्यालयात असतानापासूनच भूषण यांनी सैन्यात भर्ती होण्यासाठी तयारी केली होती. गुरेज सेक्टर येथे भूषण कार्यरत असताना पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यावेळी भारतीय जवानांनी शत्रूला जोरदार प्रतिउत्तर दिले. ज्यामध्ये तीन सामान्य नागरिकांसह आठ भारतीय जवानाना वीरमरण आले. यामध्ये भूषण यांचा सहभाग आहे. शनिवारी भुषण यांच्यावर काटोल येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोल्हापूरच्या जवानालाही वीर मरण

पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथील जवानालाही वीरमरण आले आहे. ऋषीकेश रामचंद्र जोंधळे (वय 20) असे वीर मरण आलेल्या जवानाचे नाव आहे. ऐन दिवाळीत ऋषीकेश यांना वीर मरण आल्याची माहिती समजताच त्यांच्या कुटुंबीयांवर आणि गावावर शोककळा पसरली आहे. ऋषिकेश यांची पहिलीच नेमणूक जम्मू येथे झाली होती.

पाकिस्तानचे सात ते आठ जवान ठार -

उरी सेक्टरमध्ये तीन नागरिकही पाकिस्तानच्या गोळीबारात ठार झाले तर काहीजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. उरीचे विभागीय अधिकारी रियाज अहमद मलिक यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतर भारतानेही जोरदार गोळीबार केला. यात पाकिस्तानी लष्कराचे सात ते आठ जवान ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील पाक लष्करातील स्पेशल सर्व्हीस ग्रुपच्या (SPG) जवानांचाही सहभाग आहे. तर काही पाकिस्तानी सैनिक जखमी झाल्याचीही माहिती मिळत आहे. पाकिस्तानी बंकर, इंधन साठे, दहशतवादी तळही नष्ट झाले आहेत.

Last Updated : Nov 14, 2020, 8:08 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.