ETV Bharat / state

Disha Salian: दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची एसआयटी चौकशी; देवेंद्र फडणवीसांची घोषणा - आदित्य ठाकरे यांच्यावर राहुल शेवाळेंचा आरोप

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्यात येईल. (Disha Salian Death Case) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे. या प्रकरणी कोणाकडे काही पुरावे असतील, तर ते पोलिसांना देऊ शकतात, असेही फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले आहे.

दिशा सालियन
दिशा सालियन
author img

By

Published : Dec 22, 2022, 2:08 PM IST

Updated : Dec 22, 2022, 3:21 PM IST

नागपूर - दिशा सालियन मृत्यूचे प्रकरण चांगलेच पेटले आहे. या प्रकरणाचे पडसाद आज गुरुवार (दि. 22 डिसेंबर)रोजी विधानसभेत उमटले. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी काल आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्तीला (A U) नावाने 44 फोन आले होते, हा (AU) म्हणजे आदित्य-उद्धव (Aditya-Uddhav Thackeray) असल्याची बिहार पोलिसांनी (Bihar Police) माहिती दिल्याची माहिती राहुल शेवाळे यांनी लोकसभेत दिली आहे. त्यानंतर हे प्रकरण चांगले कापले.

विधानसभेत पडसाद - खासदार राहुल शेवाळे यांनी केलेल्या आरोपानंतर आज विधानसभेत याचे पडसाद उमटले. दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे. दिशाच्या मृत्यूपूर्वीच्या पार्टीत कोण कोण होते? पार्टीत मंत्री कोण होते? आणि हा तपास कुणाच्या राजकीय दबावामुळे थांबला? याची चौकशी करण्याची मागणी यामध्ये केली आहे.

आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा - दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे. सुशांत सिंग, दिशा सालियान प्रकरण समोर येते तेव्हा आदित्य ठाकरे यांचेच नाव का घेतले जाते? असा सवाल उपस्थित करत दाल मे कुछ काला है असे राणे म्हणाले आहेत. तर ए फॉर आदित्य म्हणत शेवाळेंच्या आरोपांना राणेंनी दुजोरा दिला आहे. तसेच, मुंबई पोलिसांनी दिशा सालियन केस रिओपन करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. नितेश राणेंपाठोपाठ बडनेराचे आमदार रवी राणाही आदित्य ठाकरे यांच्या नार्को टेस्टची मागणी केली आहे. उद्या विधिमंडळात आवाज उठवणार असल्याचे रवी राणा यांनी सांगितले आहे.

एसआयटीमार्फत चौकशी करणार - दरम्यान, दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची एसआयटी मार्फत केली जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याप्रकरणात पोलीस तपास सुरु आहे, ज्यांच्याकडे पुरावे आहेत, त्यांनी पुरावे द्यावेत असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

ये AU Au कौन है? - त्याआधी विधानभवतच्या पायऱ्यांवर सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आदित्य ठाकरेंना टार्गेट करत बॅनरबाजी आणि घोषणाबाजी केली. (ये AU Au कौन है?) असे बॅनर सत्ताधाऱ्यांकडून फडकवण्यात आले.

संजय राऊत यांची टीका - आदित्य ठाकरे यांच्यावर राहुल शेवाळेंनी केलेला आरोप हा हलकटपणा, नीचपणा आहे अशी पातळी सोडून टीका संजय राऊत यांनी केली आहे. खासदार शेवाळे हे किरकोळ माणूस आहेत असे राऊत म्हणाले आहेत. भूखंड प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असल्यामुळे लक्ष विचलीत करण्यासाठी असे आरोप केले जात असल्याचे राऊत म्हणाले आहेत. तर, चेंबूरमध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंविरोधात आंदोलन केले. सुशांत सिंग प्रकरणी आदित्य ठाकरे यांचे नाव घेणाऱ्या राहुल शेवाळेंविरोधात ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

Last Updated : Dec 22, 2022, 3:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.